56 इंच छाती, ‘भाईजान’ सलमानपेक्षा मोठे ‘बायसेप्स’, तिहारचा ‘हा’ अधिकारी ‘बॉडी बिल्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहार जेलमध्ये असिस्टेंट सुपरीटेंडेंट  दीपक शर्माची  छाती 56 इंच आहे आणि बायसेप्स तर बॉलिवूड स्टार सलमान खानपेक्षाही मोठा आहे. गुन्हेगार त्यांचा देह पाहूनच कापू लागतात. तिहारमध्ये असिस्टंट सुपरीटेंडेंट बनण्याआधी ते अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये सिलेक्ट झाले आहेत. त्यांची स्टोरीही इंटरेस्टींग आहे.

मध्यवर्ती कारागृहामध्ये जेल अधिक्षक दीपक शर्मा मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. 32 वर्षीय दीपक यांनी शालेय शिक्षण गुजराती समाज सीनियर सेकेंड्री स्कुलमधून पूर्ण केलं आहे.

12 वीनंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील रामजस कॉलेजमधून पदवी घेतली. येथे ते विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2007 – 2009 मध्ये बीएड केलं. यानंतर त्यांचं पहिल्यांदा भारतीय हवाई दलात सिलेक्शन झालं होतं. याच वर्षी केंद्रीय पोलीस दलाचे असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांची निवड झाली.

2008 मध्ये बीएड दरम्यान त्यांची शिक्षक म्हणूनही निवड झाली होती. याच वर्षी त्यांना दिल्ली सेवा बोर्डमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली होती. त्यांनी आपली तयारी सुरुच ठेवली. 2009 साली ते मध्यवर्ती कारागृहात जेल अधिक्षक बनले. तेव्हापासून दहा वर्षे होत आली ते तिहारमध्ये आहेत. बॉडी बिल्डींगच्या छंदामुळे त्यांचा तुरुंगात वेगळाच दरारा आहे.

दीपक शर्मांचे वडिल दिल्ली विद्यु बोर्डातले सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांची आई गृहिणी आहे. दीपक शर्मांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांचे आदर्श त्यांचे मोठे भाऊ आणि मोटीवेशनल स्पीकर शिव खेरा आहेत.

छंदामुळे मिळाली ओळख :
जिमिंग दीपक शर्मांचा आवडता छंद आहे. ते त्यांचा रिकामा वेळ वर्कआऊटमध्ये घालवतात. दीपिक सांगतात की ते जीमसाठी 5 तास वेळ देतात. यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. याशिवाय एअर पिस्टल शुटींग ही देखील त्यांची खास हॉबी आहे.

असं आहे दीपक शर्मांचं बॉडी बिल्ड
बायसेप्स – 19 इंच
चेस्ट – 56 इंच
वेस्ट – 30 इंच
वजन – 92 किलो

अशी आहे कामगिरी, कमावले आहेत हे मेडल्स
मिस्टर दिल्ली – सिल्व्हर
मिस्टर युपी – सिल्व्हर
मिस्टर हरियाणा – गोल्ड
स्टील मॅन ऑफ इंडिया – सिल्व्हर
आयरन मॅन ऑफ इंडिया – सिल्व्हर
मिस्टर इंडिया – गोल्ड
दिल्ली श्री – सिल्व्हर
ऑल इंडिया सिव्हील सर्व्हीसेस – ब्राँज

मिळाले आहेत ‘हे’ अवॉर्ड
स्वाभिमान खेलरत्न अवॉर्ड 2019
द ग्लोबल युथ अचीव्हमेंट अवॉर्ड 2020

‘हे’ आहे गोल
ऑल इंडिया सिव्हील सर्व्हीसेस गेम्स 2020 आणि ऑल इंडिया पोलिस गेम्स इन 2020 मध्ये भाग घेण्याचं दीपक शर्मांचं गोल आहे.

फेसबुक पेज लाईक करा –