दीपिकाच्या ‘छपाक’नं कंगनाच्या ‘पंगा’ला दिली ‘मात’, 3 दिवसात कमाईमध्ये कोण पुढे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्यात 24 जानेवारीला कंगना रणौत हीचा ‘पंगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी, 10 जानेवारी रोजी दीपिका पादुकोणचा चित्रपट ‘छपाक’ आला होता. बॉलिवूडमधील या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कामगिरी करण्यात अपयशी ठरला. पण या दोन चित्रपटाच्या सुरुवातीचा शनिवार व रविवार पाहता म्हणजेच पहिल्या तीन दिवसांचे कलेक्शनला पाहिले तर दीपिकाचा ‘छपाक’ कंगनाच्या ‘पंगा’ चित्रपटावर मात देताना दिसत आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

10 जानेवारीला म्हणजे शुक्रवारी दीपिका पादाकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाने 4.77 कोटींनी ओपनिंग केली होती. 11 जानेवारी रोजी 6.90 कोटी तर दुसर्‍या दिवशी रविवारी 12 जानेवारी रोजी 7.35 कोटी जमा झाले. चित्रपटाने तीन दिवसात 19.02 कोटींचा बिझनेस केला.

24 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पंगा’ चित्रपटाने केवळ 2 कोटी रुपयांचे खाते उघडले होते. शनिवारी दुसर्‍या दिवशी 5.61 कोटी आणि तिसर्‍या दिवशी रविवारी 6.60 कोटींची कमाई केली होती, चित्रपटाने एकूण 14.91 कोटीची कमाई केली. सुरुवातीच्या आठवड्यातच कमाईच्या बाबतीत ‘छपाक’ने ‘पंगा’ ला पराभूत केले.

‘छपाक’ आणि ‘पंगा’ हे दोन्ही चित्रपट वुमन सेंट्रिक आहेत. छपाकमध्ये दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आणि पंगामध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. स्क्रीनला चांगली जागा मिळाली तरी कंगना लोकांना प्रभावित करू शकली नाही.

छपाकचे प्रमोशन पंगापेक्षा चांगले होते. छपाकचे एग्रेसिव्ह प्रमोशन झाले आणि दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये गेल्यानंतर चित्रपटाची अधिक चर्चा होऊ लागली. त्याचबरोबर कंगनाने चित्रपटाचे जास्त प्रमोशन केले नाही.

https://www.instagram.com/p/B7OjE7GA-Gd/

छपाकचे बजेट 35-40 कोटी असल्याचे सांगितले गेले आहे. त्याचबरोबर पंगाचे बजेट 45 कोटी असल्याचे सांगितले जाते. कमी बजेट असूनही, दोन्ही चित्रपटापैकी छपाकने पहिल्या आठवड्याच्या शेवटी चांगली कमाई केली आहे.

https://www.instagram.com/p/B7N9xVJgax_/

भारतीय प्रेक्षक चित्रपटांमध्ये ज्याप्रकारे कंटेट शोधतात तसाच पंगा चित्रपट आहे. हा चित्रपट फॅमिली ड्रामा, प्रेम कथा, करमणूक आणि सामाजिक संदेश, तर छपाक हा एक गंभीर समस्यावर आधारित चित्रपट आहे. म्हणजेच प्रेक्षकांची मने जिंकणारे सर्व फॅक्टर्स पंगामध्ये आहेत. असे असूनही, हा चित्रपट चांगली कामगिरी करु शकला नाही.

पहिल्या तीन दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या अहवालानुसार छपाक पंगाच्या पुढे दिसला आहे. सध्या पंगा चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत. चित्रपटाचा संग्रह हळूहळू वाढत आहे. पंगा आणि छपाक यांच्यात कोण पुढे आहे हे लवकरच कळेल.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !