Dehu Road News | देहुरोड सवाना चौकातुन निगडी कडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व वाहनांकरीता बंद करण्यात येणार

देहुरोड (Dehu Road ) परिसरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – देहुरोड वाहतूक विभाग (dehu road traffic division) हद्दीतील भागात देहूरोड बाजार (Dehu road Bazaar) येथुन पुणे (Pune) बाजूकडे जाणारा सर्व्हीस रोड (Service Road) तसेच मुंबई-पुणे जुना हायवे (Mumbai-Pune Old Highway) ते नविन रेल्वे ब्रिज (News Railway Bridge) यांना जोडणारे अंदाजे 50 मीटर एप्रोच रॅपचे तसेच रिटेनिंग बॉल चे काम करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) उपायुक्त सुधीर हिरेमठ (deputy commissioner of police sudhir hiremath) यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri-Chinchwad City) वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी मोटार वाहन कायदयानुसार पिंपरी चिंचवड शहर (Pimpri-Chinchwad City) यापूर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असून तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

 

देहूरोड-तळेगाव वाहतूक विभाग

देहुरोड सवाना चौकातुन निगडी कडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व वाहनांकरीता बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग – सवाना चौक- आधार हॉस्पीटल- स्वामी चौक- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पीटल- सेन्ट ज्यूड स्कुल पंचर समोरुन वळुन गुरुद्वारा समोरुन जुना मुंबई पुणे हायवे उडडानपुलावरुन निगडी बाजुकडे वळविण्यात येणार आहे.
सदरचे आदेश दि. 28/6/2021 पासून 11/08/2021 या कालावधीकरीता वैद्य राहील.
तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
वरील प्रमाणे वरील वाहतूक बदलाबाबत (Traffic Change) वॉर्डन व वाहतूक पोलिस कर्मचारी (Traffic Police) यांना सहकार्य करावे,
असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर (Pimpri-Chinchwad City) वाहतूक शाखेकडून (Traffic Branch) करण्यात येत आहे.

Web Title :- Dehu Road News | Service road from Dehurod Savana Chowk to Nigdi will be closed for all vehicles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी