कर्करोगाच्या निदानास विलंब ठरतोय जीवघेणा !

पुणे : लॉकडाऊनपूर्वी कर्करोगाच्या निदानाकरिता चाचण्या करण्या-या व्यक्तींची संख्या अधिक होती. मात्र त्यानंतर या संख्येत घट झाली असून भितीपोटी नागरिकांनी तपासणी करणे तसेच रुग्णालयांना भेट देणे टाळल्याचे दिसून आले. कर्करोगाच्या त्वरित निदानासाठी पॅप स्मीयर, मौखिक तपासणी, मॅमोग्राफी आणि इतर रक्त चाचण्यांसारख्या नियमित आरोग्य तपासणीची टाळाटाळ न करता वेळीच या चाचण्या केल्याने आजारापासून दूर राहण्यास मदत होते. निदानास विलंब झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

कर्करोगाची वाढती प्रकरणे पाहता कर्करोगाचा प्रतिबंध, लवकर निदान आणि त्यावर उपचार करण्याचे एक मोठे आव्हान आहे. कर्करोगाची कारणे बहुपक्षीय आहेत जसे की खाण्याच्या सवयी, प्रदूषण, रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणे, मद्यप्राशन किंवा तंबाखूचे सेवन करणे होय. वेळीच तपासणीचा मुख्य उद्देश असा की विशिष्ट कर्करोग किंवा कर्करोगापूर्वीची लक्षणे ओळखण्यास मदत होते.

डॉ. संजय इंगळे, पॅथॉलॉजिस्ट आणि पुणे अपोलो डायग्नोस्टिक्स, प. भारताचे विभागीय प्रमुख यांनी सांगितले, पुरुषांमध्ये मौखिक आणि लैंगिकदृष्ट्या कार्यशील कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, तर स्त्रिया, स्तनाचा कर्करोग, गर्भाशया आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाचा शोध घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे तसेच आवश्यक आहे. पॅप स्मीयर सारखी चाचणी ही गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान करण्यात मदत करेल. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ओव्हेरीयन कार्सिनोमा शोधण्यासाठी सीए 125 चाचणी घेतली जाऊ शकते. प्राथमिक अवस्थेतीतल निदानामुळे गर्भाशय मुखाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करता येते. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी नियमित मॅमोग्रामसाठी करुन घ्यावी. धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करणार्‍या पुरुषांनी प्रत्येक 6 महिन्यांनंतर मौखिक आरोग्याची तपासणी करावी. 40 वर्षापेक्षा जास्त पुरुष प्रत्येक वर्षानंतर प्रोस्टेट-स्पेसिफिक एन्टीजेन (पीएसए) चाचणी न चुकता करावी.

डॉ इंगळे पुढे म्हणाले, लॉकडाउनपूर्वी सुमारे 30 टक्के लोकांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार चाचण्या करून घेतल्याचे दिसून आले. आता, आणि लॉकडाऊननंतर केवळ 8% व्यक्तींनीच कर्करोगाची तपासणी करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. लॉकडाऊनपुर्वी सुमारे 10 ते15 महिला पॅप स्मीयर चाचणीसाठी येत होत्या. परंतु, कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे, मागील वर्षापर्यंत, केवळ 1-2 महिलांनीच चाचण्या केल्याचे आढळून आले आहे. जानेवारी 2021 मध्ये दररोज ५ ते ७ रुग्ण पॅप स्मीयर चाचणीसाठी येत आहेत. सध्या, कर्करोगाची चिन्हे, लक्षणे याबाबत लोकांमध्ये खूप जागरूकता असल्याचे दिसून येते.