Delta Plus Variant | डेल्टा प्लसचे पेशंट वाढल्याने राज्यात लॉकडाऊन? आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

जालना : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta Plus Variant) थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली असून तशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाला (Department of Health) दिल्या आहेत. मात्र, त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले आहे. Delta Plus Variant | no plans to impose lockdown in maharashtra health minister rajesh tope

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स (Task Force) स्थापन केले जाणार आहे. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. डेल्टा प्लस रुग्ण (Delta Plus Patient) वाढीमुळे घाबरण्याच काम नाही असेही ते म्हणाले.

जालन्यातील सामान्य रुग्णालयात 80 लाख खर्चून उभारलेला ऑक्सिजन (Oxygen) प्लॅन्ट आजपासून कार्यान्वित झाला आहे. तसेच यावेळी पूर्ण आटोमेटिक केमिकल अनालायझर मशीनचे लोकार्पणही करण्यात आले. त्यावेळी टोपे बोलत होते. यावेळी टोपे म्हणाले की, 50 रुग्णांच्या वेगवेगळ्या 360 चाचण्या एकाच वेळेस करता येऊ शकतील असे हे मशीन आता वापरात आला आहे. या गोष्टीचा मला आनंद होत आहे की, हब स्पोक मॉडेलमध्ये कॅन्सरच्या उपचाराच्या दृष्टीने औरंगाबादच्या कॅन्सर रुग्णालयाचा स्पोक मॉडेलची जालन्यात सुरुवात झाली आहे. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal), नगरपालिकेच्या नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल (Municipal Mayor Sangeetatai Gorantyal), जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे (Collector Ravindra Binwade), जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले (Doctor Archana Bhosle) उपस्थित होते.

Web Title :- Delta Plus Variant | no plans to impose lockdown in maharashtra health minister rajesh tope

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’