Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Deltacron Corona Variant | मागील काही दिवसांपासून कोरोनाने (Coronavirus) सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील सर्वत्र चिंताजनक वातावरण पसरत आहे. ‘डेल्टा’ व्हेरियंट (Delta Variant) आणि ओमिक्रॉन’ व्हेरियंट (Omicron ‘Variants) या दोन्ही विषाणूसंदर्भात एक धक्कादायक माहिती (Deltacron Corona Variant) समोर आली आहे. दरम्यान, सायप्रसमधील तज्ज्ञांना कोरोना विषाणूचा आणखी एक व्हेरियंट आढळला आहे.

 

कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा’ आणि ‘ओमिक्रॉन’ (Delta and Omicron) हे 2 व्हेरियंट एकत्र येऊन नवा व्हेरियंट तयार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आलं आहे. दरम्यान, ‘बायोटेक्नॉलॉजी आणि मॉलिक्युलर व्हायरोलॉजी’च्या प्रयोगशाळेचे प्रमुख आणि ‘सायप्रस युनिव्हर्सिटी’चे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिकिस (Professor Leonidos Kostrikis) यांच्या माहितीनूसार भारतात आत्तापर्यंत ‘डेल्टाक्रॉन’चे 25 रुग्ण सापडले आहेत. तर, कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये दुहेरी संसर्ग सापडल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. (Deltacron Corona Variant)

कोस्ट्रिकिस यांच्या माहितीनूसार, डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची सध्या नोंद केली जात आहे.
यातच आता एका नव्या प्रकाराची भर पडलीय जी या दोन्ही व्हेरियंटचं मिश्रण आहे,
तर, ‘डेल्टाक्रॉन’ अधिक संसर्गजन्य आहे किंवा नाही किंवा जुन्या व्हेरियंटहून हा
नवा प्रकार किती धोकादायक आहे याबाबत अजुन स्पष्ट माहिती समोर नाही.
दरम्यान, नव्या व्हेरियंटची लक्षणंही याआधीच्या 2 विविध व्हेरियंटमध्ये दिसलेल्या लक्षणे सारखीच आहेत.
खरंतर जागतिक आरोग्य संघटना अथवा तर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सध्या
या नव्या व्हेरियंटला अधिकृतपणे मान्यता दिली गेली नाही. असं सांगण्यात येतंय.

 

Web Title :- Deltacron Corona Variant | coronavirus in cyprus deltacron new variant cyprus records cases of new variant deltacron mixture of delta and omicron covid variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | 50 वर्षीय महिलेचा निर्घृण खून, बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना

 

PNB | ‘या’ बँकेच्या खात्यामध्ये ठेवावे लागणार किमान 10 हजार; नाहीतर ग्राहकास 600 रुपये दंड, जाणून घ्या

 

शेतकर्‍यांना मिळू शकते का e-SHRAM Card, जाणून घ्या ई-श्रम पोर्टलचे नियम

 

Post Office Gram Suraksha Yojana | केवळ 50 रुपये जमा करा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुपरहिट स्कीमध्ये मिळतील 35 लाख; जाणून घ्या सविस्तर

 

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीची ‘ही’ योजना दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 लाख रुपये देईल, जाणून घ्या अटी आणि नियम