विविध मागण्यांसाठी मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा

हडपसर: पोलीसनामा ऑनलाईन
येथील फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्त्यावरील, काळेपडळ व ससाने नगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीक यांच्यावतीने अतिक्रमण हटविण्या बाबत हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी रविपार्क ते सहाय्यक आयुक्त कार्यालय दरम्यान पदयात्रा काढून वाढलेल्या अतिक्रमणा विरोधात महापालिकेचा विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

याप्रकरणी ,वेळोवेळी निवेदने देवूनही ढिम्म महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने नागरिकांनी यावेळअधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रभारी सहाय्यक आयुक्त सुनिल यादव यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यानंतर लेखी अश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिष्टमंडळात फोष चे अध्यक्ष वैभव माने, विकास रैना, रशिद अत्तार, महेश पवार, संतोष रणावरे, अपेक्षा केळकर, प्रियंका शर्मा , सुनिता शेट्टी, मोहन जीनेलू, राजेश सोनाळेकर , अमिताभ मुख्रजी , सौम्या महापात्रो मनिष डेंगळे उपस्थित होते. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे व माजी नगरसेवक फारूख इनामदार, डॉ. शंतून जगदाळे, महोल्ला कमिटी कार्याध्यक्ष ओम करे यांनी या मोर्चाला पाठींबा दिला.

काय आहेत मागण्या?
हांडेवाडी रस्त्यावर भाजी मंडई हटवावी. सय्यदननगर रेल्वे गेटच्या दुर्तफा एक किलोमिटर अंतरावरील अतिक्रमणे हटवावीत, तसेच या मार्गावर वाहतूक कोंडी होवू नये यासाठी नो हॅाकर्स झोन व नोपार्कींग झोन करावा. स. न. 57 व 53 मधील अतिक्रणे, अनअधिकृत बांधकाम , गायराण जागेवीरील अतिक्रमणे हटवावीत. जैन टाउनशिप ते रवीपार्क या रस्त्यावरील अतिक्रमणे, शेड, कमान, गॅरेज आणि पदपखथावीरवल गाडया हटवाव्यात. महमदवाडी ते कृष्णानगर रस्ता रूंदीकरण करावे. रूणवाल व अशोकनगर सोसायटीनगर बाजूचे अतिक्रमणे हटवावीत. तसेच प्रभागात नियमित व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, आदी आमच्या मागण्या आहेत.

आयुक्तांचे लेखी आश्वासन –
सहाय्यक आयुक्त सुनिल यादव यांनी वरील मागण्या मार्गी लावण्यासाठी लेखी स्वरूपात आम्ही 25 ते 30 दिवसाचा कार्यकाळ दिला आहे. अन्य विभांगाशी संबधीत विषय त्या विभागांना सोबत घेऊन कार्यवाही करू असे लेखी अश्वासन मोर्चातील शिष्टमंडळाला दिले आहे.