Department of School Education Pune | शालेय शिक्षण विभागाकडून दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी कार्यशाळेचे आयोजन

पुणे : Department of School Education Pune | शालेय शिक्षण विभागाच्यावतीने स्टार व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोणावळा येथील द अॅम्बी व्हॅली सिटी येथे २८ व २९ एप्रिल रोजी दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे शालेय उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या हस्ते होणार आहे. (Department of School Education Pune)

या कार्यशाळेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल (IAS Ranjit Singh Deol), शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare IAS), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे (Kaillas Pagare), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Divegaonkar) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील मनपाचे आयुक्त, जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षण विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आदी अधिकारी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. (Department of School Education Pune)

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे व डॉ. नेहा बेलसरे घेणार आहेत. प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापनाचे शास्त्र या विषयावर क्वेस्ट या सामाजिक संस्थेचे निलेश निमकर उपस्थितांशी संवाद साधतील. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलास पगारे हे ‘निपुण भारत’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. दुपारच्या सत्रात यवतमाळ, सिंधुदूर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील उत्तम शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर मुक्त चर्चासत्रे होतील.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे हे स्टार प्रकल्प समग्र शिक्षेशी संबंधित प्रकल्प, ‘पीएमश्री शाळा’ या विषयावरील सादरीकरण करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण व भाषा गणिताची स्थिती या विषयावर तसेच बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील हे बालभारतीशी संबधित विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने शाळा समूह या विषयावर सादरीकरण करणार आहे. योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर नवभारत साक्षरता अभियान या विषयावर सादरीकरण करणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका या विषयावर
शिक्षण आयुक्त श्री. मांढरे व एससीईआरटीचे संचालक श्री. दिवेगावकर हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
दुपारच्या सत्रात आदर्श शाळांची सद्यस्थिती यावर चर्चा होणार असून शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव
रणजित सिंह देओल यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, योजना शिक्षण संचालक,
बालभारतीचे संचालक, राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासह राज्यातील जिल्हा शिक्षण
व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी,
आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, मनपा व नगरपरिषदेचे शिक्षण प्रमुख, प्रशासन अधिकारी,
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातील अधिकारी वर्ग आदी अधिकारी या दोन दिवसीय
कार्यशाळेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या
उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी दिली आहे.

Web Title :-  National Lok Adalat in Pune | Organized National Lok Adalat on April 30 in Pune district

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Whatsapp New Feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार