पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | सिगारेटच्या दुकानांमधून (Cigarette Shops) सिगारेटचे बॉक्स चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit 1) पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई (Pune Police Crime Branch News) वडगाव शेरी येथे मंगळवारी (दि.25) करण्यात आली.
बुधाराम बियाराम चौधरी (वय-45 सध्या रा. साईकृपा हौसींग सोसायटी, वडगाव शेरी, मुळ रा. राणीवाल जि. पोली, राजस्थान), रामलाल ढगळराम चौधरी (वय-29), महाविर बगदाराम मेघवंशी (वय-19 दोघे सध्या रा. दत्तवाडी, पुणे मुळ रा. राणीवाल जि. पोली, राजस्थान-Rajasthan) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. (Pune Police Crime Branch News)
आरोपींनी 16 एप्रिल रोजी नाना पेठेतील एका दुकानाचा पाठीमागचा दरवाजा व लॉक तोडून दुकानातील 5 लाख 9 हजार 350 रुपये किमतीचे सिगारेटचे पाकिटे व बॉक्स चोरून नेले होते. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी घटनास्थळावरील आसपासचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी आरोपी रिक्षात बसून गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी रिक्षाचा माग काढला असता संशयित आरोपी वडगाव शेरी (Vadgaon Sherry) येथील साईकृपा हौसींग सोसायटी येथे उतरल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी संशयित आरोपीचा शोध घेत असताना बुधाराम चौधरी याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता किचन ओट्या खाली सिगारेटच्या पाकीटांनी भरलेल्या पिशव्या आढळून आल्या. चौकशी दरम्यान सिगारेटची पाकिटे त्याच्या इतर दोन साथिदारींनी नाना पेठेतील दुकानातून चोरल्याचे सांगितले.
तपासादरम्यान आरोपी बुधाराम याच्या मोबाईलचे लोकेशन मंडई परिसरात असल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मंडई परिसरातील एक सिगारेटच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी बुधाराम याच्या दोन साथिदारांना अटक केली आहे. आरोपी बुधाराम याच्यावर विश्रामबाग,
कोंढवा (Kondhwa Police Station), समर्थ, हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) घरफोडी, चोरी चे 10 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI Shabbir Syed),
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kavathekar), पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव (PSI Ajay Jadhav),
सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अमोल पवार (Police Amol Pawar), आण्णा माने (Police Anna Mane),
इम्रान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई, दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, अय्याज दड्डीकर,
अभिनव लडकत, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Police Crime Branch News | Inter-state gang stealing cigarette boxes from shops on the loose; 4 lakh worth of goods seized
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला