Devendra Fadnavis | ‘अशा गोष्टी कधीकधी होतात पण…’ उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या वादावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले (व्हिडीओ)

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra raje Bhosale) यांच्यामध्ये काल साताऱ्यात भूमीपूजनावरुन वाद झाला. या वादानंतर दोन्ही राजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटले. या भेटीमुळे साताऱ्यातील राजकीय संघर्षामध्ये थेट देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थी करत असल्याची चर्चा आहे. दोन्ही राजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कराडमध्ये भेटले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी फडणवीसांना या भेटीचा तपशील विचारला. तसेच दोन्ही राजेंशी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, दोन्ही राजांसोबत सातारातल्या विविध प्रश्नांवर माझी चर्चा झाली. इथले काही सिंचनाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली. यासंबंधी त्यांनी मला काही निवेदनं दिली आहेत. तसेच विकासकामांवरही चर्चा झाली.

यावेळी फडणवीस यांना, दोन्ही राजांचा काल वाद झाला त्याबद्दल काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोघांनाही जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. अशा गोष्टी कधीकधी होत असतात. पण ते असं नाहीय की इथे काहीतरी फार गंभीर घडतंय किंवा फार अडचणीचं वगैरे आहे असं काही नाही आहे, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. तसेच दोन्ही राजेंबरोबर दोन तास चर्चा केली. त्यानंतर उदयनराजेंबरोबर तासभर चर्चा केली. ही चर्चा केवळ विकासकामांबाबत होती असंही फडणवीस यांनी भेटीनंतर स्पष्ट केलं.

काय आहे वाद?

साताऱ्यातील शिवराज ढाब्याजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bazar Samiti) नवीन आवारात झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे बुधवारी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमने-सामने आले. सकाळी 10 वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन होणार होते. मात्र 9 वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी पोहोचले, आणि तिथे असलेले साहित्य फेकून दिले. त्याचबरोबर एक कंटेनरही जेसीबीने नष्ट केला. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोर भूमीपूजन केले. (Satara News)

माझ्या जागेत भूमिपूजन करायचे नाही, असे म्हणत खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना झापले. वाद सुरू असतानाच दुसरीकडे आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजे समोर भूमिपूजन केले. त्यानंतर काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी (Satara Police) मध्यस्ती करत परिस्थिती आटोक्यात आणली.

Web Title :  Devendra Fadnavis | devendra fadnavis resolved udayanraje bhosale and shivendraraje quarrel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा