Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder | गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ”टोळीयुद्ध होणार नाही, शासन बंदोबस्त करेल” (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder | कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज दुपारी पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारदरा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात दशहतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले असताना या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. (Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सदर गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही. (Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीने टाकडलेल्या छाप्याबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, विनाकारण स्वतःला शहीद घोषित करण्याचे प्रकार सुरू आहेत.
त्यांच्या कंपनीवर छापा पडला अशी माहिती मिळत आहे. त्याच्या खोलात मी गेलेलो नाही.
त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायात अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. त्यांनी काही केले नसेल, तर काही होणार नाही.
विनाकारण घाबरण्याची गरज नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांचे
वक्तव्य मुर्खपणाचे होते. बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव आहे.
खरे म्हणजे प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे, अभिजनांचे, आदिवासींचे, दलितांचे अशा सर्वांचेच आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले, प्रभू श्रीराम शाकाहारी होते की मांसाहारी, या विषयात पडण्याची गरज नाही.
ज्यांची प्रभू श्रीरामावर श्रद्धा आहे, अशा लोकांच्या भावनाना दुखावण्याचे काम विनाकारण केले जात आहे.
आमचे वारकरी, धारकरी, टाळकरी हे सर्व बहुजन असून ते सर्व शाकाहारी आहेत, या सर्वांचा यातून अपमान नाही का झाला?
असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले, विनाकारण विवाद निर्माण करून लोकांच्या भावना दुखावून
राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. तसेच जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचे म्हणत होते,
त्यांनी साधलेले मौन त्यांची बेगडी वृत्ती दाखवून देत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder | गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ”टोळीयुद्ध होणार नाही, शासन बंदोबस्त करेल” (Video)