Devendra Fadnavis On Vidhan Sabha Maharashtra | विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार? छगन भुजबळ याच्या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Devendra Fadnavis On Vidhan Sabha Maharashtra | लोकसभा निवडणुकांच्या निकालाची (Lok Sabha Election 2024) सर्वांना प्रतीक्षा असताना आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जागावाटपाबाबत तयारी सुरु झाल्याचे चित्र आहे.(Devendra Fadnavis On Vidhan Sabha Maharashtra)

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महायुतीत अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले होते. याबाबत आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य करत विधानसभेला लोकसभेप्रमाणे खटपट होऊ नये असे म्हंटले आहे.

भुजबळ म्हणाले , ” आमचे ५० ते ५४ आमदार आहेत. त्यातील दोन चार इकडे तिकडे गेले असतील. पण महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हाही त्यांनी आपल्याला ८०-९० जागा देण्याबाबत आश्वासन दिले गेले होते. आला लोकसभा निवडणुकीवेळी जी काही खटपट झाली. ती पाहता पुढे अशी खटपट होता कामा नये.

आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना सांगितलं पाहिजे. तेवढ्या जागा मिळाल्या तर त्यातून ५०-६० आमदार निवडून येतील. असे भुजबळ यांनी सांगितले.

याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले असता भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे.
त्यामुळे जास्त जागा भाजप लढवेल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस म्हणाले, ” विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसतील,
योग्य फॉर्म्युला ठरवतील, त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला
सर्वाधिक जागा मिळतील.

पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत, त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचा जागा वाटपाचा फार्म्युला कसा ठरणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत, तोपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही, छगन भुजबळ आक्रमक

Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार प्रकरणात CP ना फोन केला? अंजली दमानियांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या!

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तडीपार केल्याच्या रागातून तरुणाला सिमेंटच्या गट्टू ने मारहाण, एकाला अटक