Chhagan Bhujbal | जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत, तोपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही, छगन भुजबळ आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे, तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही, असे थेट आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.(Chhagan Bhujbal)

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यावर सध्या चर्चा सुरु असून राज्यात यावर संतप्त पडसाद उमटत आहेत. याबाबत भुजबळ यांनी देखील आक्रमक आणि रोखठोक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणे गरजेचे आहे. जे का रंजले गांजले. त्यासि म्हणे जो आपुले. तोचि साधु ओळखावा. देव तेथेचि जाणावा, असा उपदेश देणारे संत तुकाराम महाराज असतील,

किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने
वर्तावे इशासाठी अशी शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित
व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली पाहिजे,
असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पार हा नारा दिल्यानंतर देशामध्ये संविधान बदलले जाणार असा
प्रचार विरोधकांनी केला. त्यामुळेच दलित वर्ग नाराज झाला. ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा
सुरू व्हायला लागल्यात. त्यामुळे आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसू शकतो,
हा विचार देखील आपण करायला हवा, अशी भीती भुजबळांनी व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hinjewadi Pune Crime News | पिंपरी : पिस्टलचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल व 6 काडतुसे जप्त (Video)

Kalyani Nagar Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता ससून रुग्णालयातील शिपायाला अटक

Ajit Pawar-Sharad Pawar | … म्हणून 2004 ला मुख्यमंत्रीपद नाकारल्याचा अजित पवारांचा दावा