मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सामाजिक असंतोष आणि द्वेषपूर्ण वक्तव्य संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी (दि.29) महाराष्ट्र सरकारच्या (Government of Maharashtra) कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. याचे तीव्र पडसाद गुरुवारी (दि.30) राज्यात उमटत असून राजकीय वर्तुळात विरोधकांकडून सरकारवर परखड टीका केली जात आहे. विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar Dispute) येथे दोन गटात झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोर्टाच्या टिप्पणीवर भाष्य केलं.
त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या नपुंसक (Impotent) या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, असं कोणतंही निरीक्षण केलेलं नाही. महाराष्ट्र सरकारने काय काय कारवाई केली हे दाखवल्यानंतर अद्यापही महाराष्ट्र सरकार विरोधात कंटेम्प्ट त्यांनी सुरु केलेला नाही. किंबहुना त्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही. त्याचवेळी सॉलिसिटर जनरल यांनी इतर राज्यांमध्येही काय काय होत आहे आणि महाराष्ट्रालाच पिंन पॉईंट करण्याचा प्रयत्न होतोय हे लक्षात आणून दिलं. यानंतर एक जनरल स्टेस्टमेंट सगळ्यांसाठी केलं आहे की, राज्य सरकारांनी (State Government) कारवाई केली पाहिजे. त्यामुळे कुठेही राज्य सरकारच्या विरुद्ध निर्णय दिलेला नाही. जाणीवपूर्व कुठलातरी एखादं वाक्य काढायचं आणि त्या संदर्भात बोलायचं. हे जे बोलत आहेत त्यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही, न्यायालय काय म्हणतंय ते समजत नाही. त्यामुळे हे लोकं असं बोलत आहेत. त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय आहे प्रकरण?
केरळमधील एका पत्रकाराने महाराष्ट्रात काही सभांमधून हिंदू संघटनांकडून करण्यात येत असलेल्या
द्वेषपूर्ण भाषणांवर महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित
करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने परखड टिप्पणी करताना,
हे सगळं घडतंय कारण राज्य सरकार नपुंसक आहे, असमर्थ आहे, वेळेत कारवाई करत नाही.
जर हेच घडत असेल, तर मग आपल्याला कोणत्याही राज्य सरकारची गरज काय आहे?
अशा शब्दांत न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं होतं.
Web Title :- Devendra Fadnavis | ‘…They don’t understand the court action’, Devendra Fadnavis’ attack on the opposition’s ‘that’ comment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | हनी ट्रॅप करुन मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले