Devendra Fadnavis | ‘मातोश्रीवरुन जे वरळीला गेले नाहीत ते मोदींना मणिपूरला…’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – आमचे विश्वगुरु अमेरिकेला चाललेत, त्यांना मणीपूरला जायला वेळ नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली होती. ठाकरे यांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मणीपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शाहच (Amit Shah) पुरेसे आहेत. तिथे पंतप्रधानांना जाण्याची आवश्यकता नाही. पण तुम्ही मातोश्रीतून वरळी पर्य़ंत गेला नाहीत आणि इकड मोदिजींना सांगता अमेरिकेला का जाता मणिपूरला जा, असे सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विचारला आहे. ते कराडमध्ये बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, योगासनं आणि योग करणं ही आपली पारंपारिक पद्धती आहे जी 200 पेक्षा जास्त देशांनी स्वीकारली आणि 21 जूनच्या दिवशी योग दिवस (Yoga Day) साजरा झाला. आज आपण पाहतो आहोत मोदींनी देशाच्या विकासात सामान्य माणसाला भागीदार केलं. विकास करताना गरीब कल्याणाचा अजेंडा मोदींनी राबवला. त्यामुळेच आपण पाहतोय मोदीजी अमेरिकेला गेले तर महाराष्ट्रातील नेते म्हणाले आमचे विश्वगुरू अमेरिकेला चाललेत त्यांना मणीपूरला जायला वेळ नाही. मणीपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शाहच पुरेसे आहेत. तिथे पंतप्रधानांना जाण्याची आवश्यकता नाही. पण तुम्ही मातोश्रीतून वरळी पर्य़ंत गेला नाहीत आणि इकड मोदिजींना सांगता अमेरिकेला का जाता मणिपूरला जा, असे सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?

होय मदींनीच लस तयार केली

मोदीजींनी महाराष्ट्राला काय दिले? मोदीजींनी कोव्हिडची प्रतिबंधात्मक लस (Covid Vaccine) तयार केली. परवा मी म्हटलं कोव्हिडची लस मोदींनी तयार केली तर उद्धव ठाकरेंना खूपच झोंबलं. ते म्हणाले की लस काय मोदी तयार करतात का? मग उद्धव ठाकरे रोज सांगायचे मी राज्य चालवतो म्हणजे काय ते घोड्यावर किंवा रथावर बसून हाकत होते का? की बैलबंडी हाकत होते? मी तर म्हणेन होय मदींनीच लस तयार केली.

मोदींनी शास्त्रज्ञांना 1800 कोटी दिले

याचं कारण असं आहे जगातल्या पाच देशानीच लसी तयार केल्या. या लसींचे जे रॉ मटेरिअल होतं ते दोन ते तीन देशांकडेच होतं. दुसऱ्या देशांना ते मिळत नव्हतं. मात्र मोदींचे जे चांगले संबंध इतर देशांशी आहेत त्यामुळे ते आपल्याला मिळालं. ते स्वत: त्या शास्त्रज्ञांकडे गेले मोदीजींनी त्यांना 1800 कोटी रुपये दिले आणि लस तयार करुन घेतली. त्यानंतर भारतात 140 कोटी लोकांना मोदींनी मोफत लस दिली. महाराष्ट्रात साडेसतरा कोटी लसी मोफत मोदींनी पाठवल्या. कोव्हिडची लस दिली नसती तर आपण इथे बसू शकलो असतो का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

Web Title :  Devendra Fadnavis | those who have not gone to worli from matoshree are asking modi to go to manipur devendra fadnavis taunt to uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा