Video : दिव्या भटनागरच्या पतीवर ‘गोपी बहू’ देवोलिनाचे गंभीर आरोप ! म्हणाली- ‘तुला कारागृहात पाठवेन’

पोलीसनामा ऑनलाइन – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अ‍ॅक्ट्रेस दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) चं सोमवारी (दि. 7 डिसेंबर 2020) कोरोनामुळं निधन झालं. यानंतर आता दिव्याची फ्रेंड अ‍ॅक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) नं एक व्हिडिओ पोस्ट करत दिव्याच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

देवोलिना आपल्या व्हिडिओत म्हणते, एकदा नात्यात फसवणूक झाली की, दुसऱ्यांची चूक करण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळी जो कुणी खांदा देतो, त्याच्यासोबत मुली पुन्हा नातं जोडतात. दिव्या खूपच निरागस होती. मी तिला खूपदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. मी तिचा पती गगन गबरू (Gagan Gabru) बद्दल बोलत आहे. त्या व्यक्तीनं दिव्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. दिव्यानं स्वीकारावं, यासाठी त्यानं विनवणी केली आणि तिच्या या निर्णयामुळं मी 4 वर्षे तिच्यापासून लांब होते.

दिव्या आणि गगन 2019 मध्ये विवाहबद्ध झाले होते. शिमल्यात गगनविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो जामिनावर सुटला आहे, असा खुलासाही देवोलिनानं केला आहे. तू दिव्याचा आतोनात छळ केला आहे. तू पुन्हा कारागृहात जाशील. देव तुला कधीच माफ करणार नाही, असंही ती म्हणाली आहे.

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिनं गुलाबोची भूमिका साकारली होती.