उद्या रेणू शर्मा माध्यमांसमोर करणार मुंडे प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीतील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मुंडे प्रकरण दररोज नवे वळण घेताना दिसत आहे. एकीकडे रेणू शर्माने आपल्या ट्विटमध्ये आपण एक पाऊल मागे घेत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे तिच्या वकिलाने शुक्रवारी (दि.15) मुंबईत पत्रकार घेत उद्या रेणू शर्मा पुन्हा पोलिसांमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहे. तसेच त्या उद्या माध्यमांशी बोलणार असल्याचे तीचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत माध्यमांशी बोलताना काल संध्याकाळपासून आपल्याला धमक्या येत असल्याचे त्रिपाठी म्हणाले आहेत. दर दोन मिनिटांनी मला धमकीचा फोन येत आहे. आपल्याला तब्बल दोनशेपेक्षा जास्त धमकीचे फोन आल्याचे त्रिपाठी म्हणाले. केस सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. याबाबत आम्ही गृहमंत्री आणि ACP यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल, अशी आशा रेणू शर्माच्या वकिलाने आज माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. याप्रकरणी आपण मुंबईचे ACP यांना ई-मेल करून उद्या अकरा वाजता जबाब नोंदवायला येत असल्याचे म्हटले आहे. तसेच वकिलाला घाबरवण्यापेक्षा न्यायालयात तुमच्यावरील आरोप खोटे असल्याचे सिध्द करा, असे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

हनी ट्रॅप वगैरे काही नाही..
माझ्या आशिलावर हनी ट्रॅपचे आरोप लावले जात आहे. मात्र तसे काही नाही. माझ्यावर देखील केस करून खोटे आरोप लावले जात आहेत. आमच्यावर लावलेले आरोप हे मूळ प्रकरणाला बगल देण्यासाठी केले जात आहेत. जबरदस्ती कुणालाही त्रास देण्याचा माझ्या अशिलाचा बेत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, ते आम्ही पोलिस आणि कोर्टात देणार आहोत. मुंडे यांच्या पत्नीच्या केसशी आमचा काहीही संबंध नाही. दोन्ही सख्या बहिणी असल्या म्हणून माझ्या अशिलावर रेप करण्याचा अधिकार मिळत नाही. काल आमचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले आहे. उद्या बाकीचे उरलेलं स्टेटमेंट रेकॉर्ड होणार आहे. आमच्या आशिल उद्या सगळ तुमच्या समोर मांडतील. मूळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी इतर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत.