Dhanushya Baan-Shivsena | निवडणूक आयोगातील धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर मोठं अपडेट, शिवसेना आणि शिंदे गटाची प्रतीक्षा वाढली

नवी दिल्ली : Dhanushya Baan-Shivsena | शिवसेना आणि शिंदे गटात (CM Eknath Shinde Group) सुरू असलेला धनुष्यबाण चिन्हाचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे. आज 7 तारखेला निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती. मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोग (Election Commission Of India) धनुष्यबाणावर आजच निर्णय घेऊ शकते असा अंदाज होता. परंतु, आयोगासमोरील धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे. निवडणूक आयोगात धनुष्यबाणावर आज निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Dhanushya Baan-Shivsena )

मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय देईल आणि चिन्ह दोन्ही पैकी एका गटाला मिळेल किंवा ते गोठवण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकला आहे. निवडणूक चिन्हाबाबत 7 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेला देण्यात आलेली मुदत आज संपत आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगापुढे पुरावे सादर करू शकते. शिवसेनेने पुरावे सादर केल्यानंतर धनुष्यबाणाबाबत निर्णय देण्याची तारीख ठरणार आहे. (Dhanushya Baan-Shivsena )

धनुष्यबाण चिन्ह गोठवावे, अशी मागणी करणारा शिंदे गट आता आग्रही झाला आहे.
शिंदे गटाने एक याचिका दाखल केली असून यात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या
प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा नसल्यानेच निवडणूक आयोगाने पुरेशी कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस काढूनही वारंवार मुदत वाढवून मागत आहेत.
पक्षाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नाही.
त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता आयोगाने लवकरात लवकर पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा,
अन्यथा याचिकाकर्त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे.

Web Title :- Dhanushya Baan-Shivsena | whose dhanushya baan shiv sena or shinde group on delaying the decision of the election commission of india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sandeep Lamichhane | IPL खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Shivsena Chandrakant Khaire On CM Eknath Shinde | चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले – ‘आधी पक्ष फोडला आणि आता घर फोडण्याचं काम सुरुय’