Sandeep Lamichhane | IPL खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

पोलीसनामा ऑनलाईन : Sandeep Lamichhane | नेपाळचा (Nepal) युवा क्रिकेटर आणि माजी कर्णधार संदीप लमिछानेला (Sandeep Lamichhane) आज नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे क्रिकेट (Cricket) विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार,क्रिकेट खेळण्यासाठी देशाबाहेर असलेला लमिछाने आज मायदेशात परतला असताना काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Tribhuvan International Airport) त्याला ताब्यात घेण्यात आले.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

संदीप लमिछानेवर एका 17 वर्षांच्या मुलीवर काठमांडूच्या एका हॉटेलवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीने ऑगस्टमध्ये 22 वर्षांच्या लमिछानेनं आपल्यासोबत दुष्कृत्य केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या मुलीला काठमांडूमध्ये अनेक ठिकाणी फिरवण्यात आलं. त्यानंतर त्याच रात्री हॉटेलमध्ये तिचं शारीरिक शोषण करण्यात आले. (Sandeep Lamichhane)

IPL खेळणारा पहिला नेपाळी

संदीप लमिछाने हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला नेपाळी क्रिकेटर आहे. त्याने 2018 साली दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फ्रँचायझीकडून पदार्पण केले होते.

लमिछानेनं फेटाळले आरोप

संदीप लमिछानेनं मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी उद्या प्रामाणिकपणे काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10 वाजता दाखल होणार आहे. मला खात्री आहे की मला या प्रकरणी पूर्ण न्याय मिळेल आणि मी माझ्या देशासाठी पुन्हा क्रिकेट खेळेन. मी चौकशीदरम्यान पूर्ण मदत करेन आणि मी निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई देखील लढेन.’ असे संदीप लमिछानेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले आहे.

Web Title :- Sandeep Lamichhane | nepal cricketer sandeep lamichhane arrested by nepal police on rape charges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Registration and Stamp Duty Dept | तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबतचा अहवाल महसूल सचिवांकडे सादर

Nana Patole | ज्यांना स्वतःचा पक्ष नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद, नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना टोला