Dhayari Pune Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dhayari Pune Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला अडवून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने बोलण्यास नकार दिल्याने घरच्यांना व तिला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. याप्रकरणी एका व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 पासून 22 एप्रिल 2024 या कालावधीत रायकर मळा, धायरी (Raikar Mala Dhayari) येथे वारंवार घडला आहे.(Dhayari Pune Crime)

याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून रमेश बबन मरगळे Ramesh Baban Margle (रा. खेडेकर नगर, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे) याच्यावर आयपीसी 354(ड), 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडीत मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडीत मुलीचा 2023 पासून वारंवार पाठलाग करुन विनयभंग (Molestation Case) केला.

रमेश मरगळगे याने सोमवारी (दि.22) रायकर मळा येथील सिल्व्हर बर्च हॉस्पिटलजवळ पीडित मुलीला थांबवले.
मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हटले असता तिने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला.
तसेच त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. गेला नाही तर घरी सांगेन. तसेच पोलीस चौकीत तक्रार करेन असे सांगितले. त्यावेळी आरोपीने माझ्या विरोधात तक्रार केली तर मी तुझ्या घरच्यांना सोडणार नाही. त्यांना मारुन टाकेन अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग

पुणे : फेसबुक व इन्स्टाग्रामवर महिलेचा पाठलाग करुन तिला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना घटना घडली आहे.
याप्रकरणी रोहित राजेंद्र जगताप Rohit Rajendra Jagtap (वय-30 रा. रिव्हरेज स्मशानभूमी जवळ, पिंपरी)
याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 504, 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने पीडीत महिलेचा 2021 पासून फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठलाग केला.
फिर्यादी यांना अश्लील मेसेज व शिवीगाळ करुन धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio | डाटा वापरात चायना मोबाईलला मागे टाकून रिलायन्स जिओ बनला जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर

Devachi Uruli Garbage Depot | देवाची उरुळी कचरा डेपोतील लॅन्डफिलिंग व रामटेकडी प्रक्रिया प्रकल्पात ‘गोलमाल’ प्रकरणाची चौकशी करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.