Devachi Uruli Garbage Depot | देवाची उरुळी कचरा डेपोतील लॅन्डफिलिंग व रामटेकडी प्रक्रिया प्रकल्पात ‘गोलमाल’ प्रकरणाची चौकशी करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Devachi Uruli Garbage Depot | देवाची उरुळी कचरा डेपोतील सायंटिफिक लॅन्डफिलिंग मध्ये लिचेटवर प्रक्रिया न केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच रामटेकडी येथील प्रकल्पात (Ramtekdi Garbage Depot) क्षमता वाढ करताना बसवलेल्या मशिनरी व प्रत्यक्षात प्रक्रिया केलेला कचरा याचे पहिल्यापासूनऑडिट करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. (Prithviraj B P IAS) यांनी दिली.(Devachi Uruli Garbage Depot)

देवाची उरुळी येथील कचरा डेपोचे कॅपिंग प्रकल्पातील सायंटिफिक लँड फिलिंगचे काम एका कंपनीला देण्यात आले होते.
या प्रकल्पात कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या लिचेट वर प्रक्रिया करण्यासाठी देखील पैसे मोजण्यात आले.
मात्र, या लीचेटवर प्रक्रियाच केली गेली नाही.
हे लिचेट येथील विहिरींमध्ये साठवून तेच पुन्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर मारण्यात आल्याचे अधिकारी सांगतात. तसेच या ठेकेदाराला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम देण्यात आले होते. सुरवातीला 50 मेट्रिक टन चे काम देण्यात आले. नंतर याच प्रकल्पात क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अतिरिक्त मशिनरी साठी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला अधिकचे पैसे देखील दिले. परंतु प्रत्यक्षात मशिनरी बसविण्यात आली नाही. घनकचरा विभागातील दोन अधिकाऱ्यांनी यासाठी बरीच ‘ मेहनत ‘ घेतली आहे. सध्या हे दोन्ही अधिकारी घनकचरा विभागात कार्यरत नसले तरी वरिष्ठांच्या कृपाछत्रामुळे आजही घनकचरा विभागातील (Solid Waste Management PMC) कामकाजात हस्तक्षेप करतात. यामुळे घनकचरा विभागातील अधिकारी मेटाकुटीला आले आहेत.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल.
सायंटिफिक लॅन्डफिलिंग मध्ये लिचेट वर प्रक्रियेबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
रामटेकडी येथील प्रकल्पात बसवण्यात आलेली मशिनरी आणि प्रत्यक्षात प्रक्रिया केलेला कचरा व अदा करण्यात आलेले
पैसे याचे ऑडिट करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार; पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा

Pune Crime Branch | पुणे पोलिसांचे सराईत गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर; सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये गोळीबाराचा थरार !

Aaditya Thackeray On BJP | आदित्य ठाकरेंचा सवाल, म्हणाले – ”शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, गोळ्या चालवल्या, त्या भाजपाला मत देणार का?”