Dhirendra Krishna Shastri | साईबाबांवरील विधानावर भक्तांची नाराजी, अखेर बागेश्वर बाबा नरमले, म्हणाले- ‘माझ्या बोलण्याने कोणाचे मन…’

छतरपूर : वृत्तसंस्था – बागेश्वर धामचे प्रमुख पंडीत धीरेद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी ‘साईबाबा (Sai Baba) हे संत असू शकतात, फकीर असू शकत्ता, मात्र ते देव होऊ शकत नाहीत’, असं वादग्रस्त विधान केलं होतं. साईबाबांवर केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. तसेच साई भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी माफी मागितली आहे.

धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) म्हणाले, संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर आहे. जो सदैव राहील. मी एक म्हण सांगितली, मी माझ्या मागे छत्री ठेवून स्वत:ला शंकराचार्य आहोत असं म्हटले तर हे कसं होईल?

कोणाचे मन दुखावले असेल तर…

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आमच्या शंकराचार्यांनी जे सांगितले होते त्याचा आम्ही पुनरुच्चार केला. साईबाबा संत-फकीर असू शकतात आणि लोकांचा त्यांच्यावर वैयक्तिक विश्वास आहे. जर कोणी संत गुरुंना देव मानत असेल तर ती त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे. यात आमचा कोणताही आक्षेप नाही. माझ्या कोणत्याही बोलण्याने कोणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मला मनापासून वाईट वाटते.

काय म्हणाले होते पंडीत धीरेंद्र शास्त्री?

जबलपूरमध्ये भागवतकथा (Bhagwat Katha) कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी धीरेंद्र शास्त्री लोकांशी बोलत होते.
त्यावेळी साईबाबांविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला.
आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी (Shankaracharya) साईबाबांना देवाचं स्थान दिलं नाही.
शंकराचार्य यांचे म्हणणं मान्य करणं बंधनकारक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट ही सनातनींचा धर्म आहे.
कारण ते धर्मांचे पंतप्रधान आहेत. कोणीही संत असेल मग ते आमच्या धर्माचे असले तरी ते देव असू शकत नाहीत.

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, संत कोणही असो, तुलसीदास, सूरदास हे सगळे संत आहेत. कोणी महापुरुष, कोणी युगपुरुष,
कोणी कल्पपुरुष आहेत. पण यात देव कुणीही नाही.
आम्ही कुणाच्या भावनांना दुखावू शकत नाही पण सांगू शकतो की साईबाबा संत-फकीर असू शकतात,
मात्र देव असू शकत नाही. आपल्या विधानावरुन वाद सुरु होतील असे सांगताना ते म्हणाले, आता लोग वाद करतील,
पण सत्य बोलणं गरजेचं आहे. कोणीही कोल्ह्याची कातडी पांघरून सिंह बनू शकत नसल्याचे पंडीत धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले होते.

Web Title :-  Dhirendra Krishna Shastri | bageshwar dham dhirendra krishna shastri apologize after controversial statement on sai baba

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस