लागलेली वाईट ‘नजर’ आणि ‘हाय’ दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे ‘हा’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बऱ्याचदा वाईट नजरेमुळे व्यक्ती चिडचिड करू लागते, ज्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक युक्त्या वापरूनही समाधान काही होत नाही अश्यावेळी लाल किताबमधील युक्त्या उपयुक्त ठरतात. जाणून घेऊया कोणत्या युक्त्या आपला वाईट नजरेपासून बचाव करतील.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात कोरड्या लाल मिरच्या, कांद्याची साले, तुरटीचा एक छोटा तुकडा, सात लसणाच्या कळ्या, थोडी मोहरी, एक चमचा मीठ आणि एका शेणाच्या थापीची आवश्यकता असेल.

तुम्हाला अगोदर शेणाची थाप पेटवावी लागेल. यानंतर, सर्व वस्तू आपल्या हातात घ्या, ज्याला हाय किंवा नजर लागली असेल, त्या व्यक्तीच्या डोक्यावरुन पाय पर्यंत सात वेळा फिरवून ते जळत्या आगीत टाका. यामुळे व्यक्तीला लागलेली हाय, वाईट नजर यापासून सूटका होईल आणि लवकरच आपल्याला त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये आणि आरोग्यामध्ये बदल दिसेल.