Digital News Publishers-Accreditation | डिजिटल वृत्त संस्थामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना मिळणार अधिस्वीकृती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Digital News Publishers-Accreditation | डिजिटल वृत संस्थांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना (Journalists) पहिल्यांदाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (I&B Ministry), प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोद्वारे (Press Information Bureau) सोमवारी प्रकाशित नवीन केंद्रीय माध्यम अधिस्वीकृती दिशानिर्देश 2022 च्या (Central Media Accreditation Guidelines 2022) अंतर्गत मान्यता देण्यात येणार असल्याचं वृत्त TOI नं दिलं आहे. (Digital News Publishers-Accreditation)

 

या दिशानिर्देशाच्या आधारावर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (National Capital Region) कार्यरत पत्रकारांना सरकारी अधिस्वीकृती (Government Accreditation) प्रदान केली जात आहे. ही मान्यता 1 फेब्रुवारीपासून लागू झाली आहे.

 

दिशानिर्देशांनुसार, समाचार अ‍ॅग्रीगेटर्सचा अधिस्वीकृतीसाठी विचार केला जाणार नाही, परंतु डिजिटल न्यूज पब्लिशर्स (Digital News Publishers) ज्यांनी आयटी (मध्यवर्ती दिशानिर्देश आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड – Digital Media Ethics Coad), कायदा, 2021 अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आवश्यक माहिती सादर केली आहे, आणि कोणताही गुन्हा दाखल नाही आणि किमान एक वर्षापासून सातत्याने काम करत आहेत ते अधिस्वीकृतीसाठी पात्र असतील.

वेगवेगळ्या वृत्त संस्थांसाठी त्यांचे सर्क्युलेशन, व्ह्यूवरशीप किंवा सबस्क्रीपशनच्या आकड्यावर हा कोटा ठरवला जाईल.
मात्र, यामुळे अधिस्वीकृती धारकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

 

उदाहरणार्थ, एक लाखापेक्षा जास्त सर्क्युलेशन असणारे दैनिक, साप्ताहिक किंवा पाक्षिकाला 15 लोकांच्या कोट्याचा अधिकार असेल.
तर 500 पेक्षा जास्त ग्राहक (Subscriber) असेलल्या प्रिंट वृत्तसंस्थेला (Print Media News Agency) 50 अधिस्वीकृती मिळतील. (Digital News Publishers-Accreditation)

 

प्रिंट आणि टीव्ही वृत्तसंस्था ज्यांकडे डिजिटल मीडिया आहे,
त्यांना आपल्या अगोदरच्या कोट्यात डिजिटलमधील पत्रकारांचा समावेश करावा लागेल.
आता नवीन अधिस्वीकृतीसाठी अर्ज करणार्‍या प्रिंट मीडिया पत्रकारांना सुद्धा आपल्या प्रकाशन संस्थेचे आरएनआय रजिस्ट्रेशन आणि संचालन प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता असेल,
तर टीव्ही न्यूज चॅनलच्या पत्रकारांना आय अँड बी मिनिस्ट्रीच्या परवानगीचे पत्र सादर करावे लागेल.

 

इतर बदलांमध्ये, केंद्रीय माध्यम अधिस्वीकृती मार्गदर्शक तत्व, 2022 ने ’दिर्घ आणि प्रतिष्ठित श्रेणी’ अधिस्वीकृतीचे बदलून ’वरिष्ठ’ केले आहे आणि या श्रेणीमध्ये व्यक्तींसाठी 20 वर्षांसाठी पीआईबी अधिस्वीकृती (PIB Accreditation) असल्यास पात्र होण्याची अनिवार्यतेची अट काढून टाकली आहे.

 

आता, 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे पत्रकार म्हणून काम करणारे ’वरिष्ठ’ म्हणून अर्ज करण्यास पात्र असतील.
फ्रीलान्स कॅटेगरीत पत्रकारांना पहिल्याप्रमाणेच 20 (15 च्या ऐवजी) क्लिपिंग द्याव्या लागतील.
सरकारने पत्रकारितेच्या माध्यमातून श्रमिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी सीए प्रमाणपत्राची अनिवार्यता बंद केली आहे.

 

Web Title :- Digital News Publishers-Accreditation | Digital News Publishers Accreditation journalists with digital companies to get accreditation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा