Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात, होऊ शकतात 5 मोठे आजार

नवी दिल्ली : Dirty Bedsheet | अंथरुण नियमितपणे स्वच्छता न ठेवल्‍यामुळे बॅक्टेरिया किंवा इतर प्रकारचे मायक्रो ऑर्गेनिज्म जमा झाल्याने अनेक आजार आणि इन्फेक्शन होण्‍याचा धोका वाढतो. म्हणूनच बेडची नियमित स्वच्छता राखणे फार महत्वाचे आहे. वेबएमडीच्या वृत्तानुसार, बेडशीट न धुतल्याने कोणत्या इन्फेक्शनचा धोका वाढतो ते जाणून घेऊया (Disadvantages of dirty bedsheet)…

घाणेरड्या बेडशीटचे ५ मोठे तोटे

फॉलिक्युलाइट्स :

बेडशीट वेळेवर बदलली नाही किंवा धुतली नाही तर आरोग्याला हानी पोहोचते. डेड स्किन सेल्स, घाम आणि तेल यांसारख्या गोष्टी त्यावर जमा होतात. यामुळे डोक्यावरील हेयर फॉलिकल बंद होतात. या स्थितीमुळे त्वचा लाल होणे, सूज येणे अशा समस्या होतात. बॅक्टेरिया जमा झाल्याने असे होते. (Dirty Bedsheet)

रिंगवर्म :

कपड्यांमधील घाण आणि ओलावा यामुळे रिंगवर्म होतात. हा एक प्रकारचा संसर्ग आहे. याचे मुख्य कारण फंगल आहे, जे कमी ओलाव्याच्या भागात वाढते. हे टाळण्यासाठी बेडशीट, चादर ताबडतोब बदलून स्वच्छ करा. अन्यथा डोळ्यात पाणी येणे, खाज सुटणे आणि त्वचेवर लाल पुरळ येणे अशी समस्या होते.

अ‍ॅक्ने :

घाणेरड्या बेडशीटवर सिबम जमा होते, ज्यामुळे त्वचेवर अ‍ॅक्ने आणि ब्रेक आउट होते. त्वचा रोज या बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्याने त्वचेची स्थिती बिघडू शकते. दररोज एक नवीन मुरुम येऊ शकते. यामुळे, त्वचेवर सूज देखील येते. (Dirty Bedsheet)

इम्पेटिगो :

जर शरीरात जखम असेल तर अशा स्थितीत घाण टाळली पाहिजे. दुखापत किंवा जखमेमुळे इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. त्वचेच्या जखमेतून बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे संसर्ग होतो. अशाच प्रकारे, इम्पेटिगो त्वचेच्या वेगवेगळ्या भागात पसरतो आणि इतर लक्षणे देखील दिसू लागतात.

अ‍ॅथलीट फूट :

बेडशीटमधील फंगस अ‍ॅथलीट फूटची समस्याही वाढते. हे एक फंगल इन्फेक्शन आहे.
जे अनेकदा फक्त पावसाळ्यात पाहायला मिळते.
बेडशीटमधील फंगलच्या संपर्कात आल्याने ही समस्या उद्भवू शकते.
यामुळे त्वचेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खूप खाज सुटते. लाल चट्टे उठतात. तसेच पायाची त्वचाही सोलली जाते आणि तडे जातात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात साजरा करा, पुणे पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन