प्रेयसीमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्याची बदली झाल्याची ‘खमंग’ चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कामकाजाचा एक भाग म्हणून सरकारी नोकरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली होत असते. मात्र, अंधेरी पश्चिम भवन्स कॉलेज जवळील असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंत्याची या प्रेयसीमुळे बदली झाल्याची सध्या जोरदार चर्चा सार्वजनिक बांधकाम खात्यात आहे.

सदर प्रेयसीबाबत या खात्यात जोरदार चर्चा आहे. मूळची नाशिकच्या असलेल्या या प्रेयसीचे सध्या पुण्यात वास्तव्य असल्याचे समजते. सदर प्रेयसी एक मॉडेल असून तिने अनेकांना आपल्या हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर कार्यकारी अभियंत्याने या प्रेयसीवर अगणित पैसे उधळले आहेत. तीच्या नावावर अनेक उद्योगधंदे सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सदर कार्यकारी अभियंत्याची एक प्रेयसी आहे. त्याचे या प्रेयसीसोबत मधूर संबंध निदर्शनास आल्याने या खात्यातील वरिष्ठांनी तातडीने त्याची बदली करून साईड पोस्टिंग दिल्याचे समजते. या कार्यकारी अभियंत्याला चेंबूर येथे साईड पोस्टिंग दिली आहे. मात्र, त्यांनी अजून येथील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला नसल्याचे समजते.