Disha Parmar | ढगळ्या कपड्यांमध्ये दिशा परमारनं लपवलं पोट, चाहत्यांनी बांधला गोड बातमी असल्याचा अंदाज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Disha Parmar | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा परमारनं (Disha Parmar) नुकतंच तिच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीनं ढगळा फिटिंगचा ड्रेस परिधान केला आहे. त्यामुळं तिनं ढगळ्या ड्रेसमध्ये आपलं पोट लपवलं असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.

 

 

अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) सोशल मीडियावर खूप प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांना घायाळ करत असतात. अलीकडेच दिशीचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल(Viral Photo) होताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं ढगळा फिटिंगचा ड्रेस परिधान केला असून, तिचा हा फोटो पाहून चाहते भलताच अंदाज बांधत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

 

 

फोटोमध्ये दिशानं गडद हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. केस मोकळे सोडून अगदी हलका मेकअपचा टच दिलाय. फोटोमध्ये तिनं पोट लपवलं असल्याचं दिसत आहे. तर अभिनेत्रीला लूज कपड्यामध्ये पाहून अनेक चाहत्यांनी काही गोड बातमी असल्याचा अंदाज बांधला आहे. चाहते दिशाकडून आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आतूर झालं आहेत. परंतु यावर दिशा आणि राहुलनं कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

 

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल वैद्यनं इन्टाग्रामवर ‘आस्क मी’चं सेसन घेतलं होतं. एका युजरनं त्यावर प्रश्न विचारला, तुमची इच्छा काय आहे? यावर तो म्हटला होता, “मला मुलीचा बाप व्हायचे आहे.” त्यामुळं त्याचा या वक्तव्यानंतर दिशाच्या गरोदरपणाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

 

 

 

 

Web Title :- Disha Parmar | Disha parmar hide her tummy in loose fitting clothes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा