दिव्या भटनागरच्या निधनाच्या 3 दिवसांनंतर समोर आलं Chat ! म्हणाली- ‘बेल्टनं मारायचा, अनेकदा मोडलीत बोटं’

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम ॲक्ट्रेस दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) चं सोमवारी (दि 7 डिसेंबर 2020) कोरोनामुळं निधन झालं. अवघ्या 34 व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. दिव्याच्या निधनानंतर तिची फ्रेंड ॲक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) नं एक व्हिडीओ पोस्ट करत दिव्याचा पती गगन गबरू (Gagan Gabru) वर अनेक गंभीर आरोप केले होते.

इतकंच नाही तर कुटुंबीयांनी देखील देवोलिना म्हणते त्याप्रमाणे दिव्याचा पती गगन गबरू वर दिव्याला मारहाण आणि तिचा मानसिक तसेच शारीरिक छळाचा आरोप केला आहे. कुटुंबीय गगन विरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल करण्याच्या तयारीत आहेत. आता दिव्याची चॅटींग समोर आली आहे. यात दिव्या सांगत आहे की, तिला गगन सोबत लग्न करायचं नव्हतं. पंरतु तिला धमकावून तिच्यासोबत गगननं लग्न केलं होतं असं दिव्या सांगत आहे.

दिव्याला बेल्टनं मारत होता गगन, अनेकदा मोडली होती बोटं

दिव्याचं इंस्टाग्राम तिचा भाऊ देवाशीष भटनागर हँडल करत आहे. त्यानं ॲक्ट्रेसचं चॅटींग शेअर केलं आहे ज्यात दिव्या सांगत आहे की, गगननं अनेकदा तिची बोटं मोडली आहेत. यात दिव्या म्हणते, मी सहन करत होते. बहुतेक त्याच्यावर केस झाल्यानं तो फ्रस्ट्रेट होता. यानंतर त्यानं मला धमकावून लग्न केलं. मी नव्हते करत. प्रत्येक गोष्टीवर मारतो. माझ्या हाताची बोट तर माहिती नाही किती वेळा मोडली असतील.

दिव्या म्हणते, हे सगळं गगननं प्लानिंग करून केलं आहे. यात त्याच्या आईचाही सहभाग आहे. त्यांनी मुंबईत आपलं स्थान मिळण्यासाठी प्लानिंग करून त्यांनी हे केलं. लहान लहान गोष्टींवरून तो बेल्टनं मारत होता.

दिव्याच्या भावानं लिहिली ही पोस्ट

हे चॅट शेअर करत दिव्याच्या भावानं लिहिलं की, काश मला हे सगळं कळालं असतं. काश मी तिला सांगू शकलो असतो की, आपल्यासाठी स्टँड घेणं योग्य आहे. काश मी तिला सांगू शकलो असतो की, मुली सर्वात ताकदवान प्रजाती आहेत. काश मी तिला या राक्षसापासून वाचवू शकलो असतो. गगन मला आणि माझ्या आईला मारेल. गगनला फाशी झाली पाहिजे असंदी देवाशीष म्हणाला आहे.

देवाशीषनं शेअर केलेली ही चॅटवाली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहते ही पोस्ट पाहून अवाक् झाले आहेत. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे.

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिनं गुलाबोची भूमिका साकारली होती.