‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अ‍ॅक्ट्रेस दिव्या भटनागरचं निधन !

पोलिसनामा ऑनलाइन – सोमवारी (दि 7 डिसेंबर 2020) टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका लागला आहे. व्हेंटीलेटरवर आयुष्याशी लढा देणारी अ‍ॅक्ट्रेस दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) चं निधन झालं आहे. दिव्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तिला गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

समोर आलेल्या माहितीनुसार दिव्याला निमोनिया झाला होता. दिव्याची स्थिती गंभीर होती असंही सांगितलं जात आहे. तिची ऑक्सिजन लेव्हल कमी होती. त्यामुळं तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता तिनं जगाचा निरोप घेतला आहे. दिव्या 34 वर्षांची होती.

दिव्याची फ्रेंड अ‍ॅक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) नं इंस्टावरून पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. तू खूप लवकर गेलीस असं म्हणत तिनं भावना मांडल्या आहेत.

मित्रानं केली वृत्ताची पुष्टी

देवोलिनाच्या पोस्ट व्यतिरीक्त दिव्या भटनागरचा मित्र युवराज रघुवंशीनं अ‍ॅक्ट्रेसच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यानं सांगितलं की, आज पहाटे 3 वाजता दिव्याचं निधन झालं आहे. रात्री 2 वा. अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. तिला 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. यानंतर 3 वा. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिनं गुलाबोची भूमिका साकारली होती.