जाणून घ्या, अनुष्का आणि विराटकडे किती आहे संपत्ती ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम, 2 डिसेंबर 2020 : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सर्वांचे लाडके सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखले जात आहेत. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहतात. मात्र, त्या दोघांकडे मिळून एकूण किती संपत्ती असेल? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे या दोघांची संपत्ती जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी धडपड केलीय.

‘फॉर्ब्स’ आणि ’जीक्यू’ने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी 2020 मध्ये विराट व अनुष्काकडे एकूण 1200 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांची एकूण संपत्ती पाहता ते बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कपल आहे, असे म्हटले जात आहे.

2019 मध्ये ‘फॉर्ब्स’ने सर्वाधिक कमाई करणार्‍या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केलीय. यात विराट कोहलीचा देखील समावेश होता. 2019 मध्ये विराटने 252 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. त्यावेळी त्याच्याकडे एकूण संपत्ती 900 कोटी रुपये होती.

आता, अनुष्का विषयी बोलायचे झाले तर 2019 मध्ये अनुष्काने सुमारे 28 कोटी रुपये कमावले होते. तिची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये इतकी होती. विराट आणि अनुष्काचे मुंबईत आलिशान घर आहे. त्याच्या घराची किंमत सुमारे 34 कोटी रुपये आहे, असे सांगितले जात आहे.

You might also like