‘मकर संक्रांती’च्या दिवशी ‘या’ गोष्टींचं करावं दान, जीवनात सदैव होत राहते सुखप्राप्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मकर संक्रांतीचा सण देशभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हा सण खूप विशेष मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव धनु राशीतून मकर राशीत येतात. मकर संक्रांतीच्या दिवशी नदी व जलकुंडात स्नान करणे, दान करणे अशी काही कार्य केली जातात. काही खास गोष्टींचे दान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होत असते.

बरेच लोक मकर संक्रांतीला खिचडीच्या नावानेही ओळखतात. या दिवशी खिचडी वाटप करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान केल्याने जीवनात आनंद आणि शांती येते. आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ व गूळ दान करण्याला खूप महत्त्व आहे. धर्मग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ व गूळ दान केल्यास कुंडलीत सूर्य आणि शनिची स्थिती बळकट होते. समाजात सन्मान वाढतो आणि कार्य सिद्ध होतात.

असे म्हटले जाते की ज्यांच्यावर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असतो, त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात काळी तीळ भरुन एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे. असे केल्यास आपल्या कुंडलीतील शनिदोष नाहीसा होतो. नोकरी व व्यवसायात प्रगती होते आणि तुमच्या समस्या संपतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान करण्यास देखील खूप महत्व आहे. जर एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ सुरु असेल तर त्याने मकरसंक्रांतीच्या दिवशी मीठ दान करावे. मकरसंक्रांतीला तूप दान करणे देखील चांगले मानले जाते. हा उपाय केल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात. या उपायाने देवी लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर बनून राहते. याशिवाय गरजू लोकांना या दिवशी धान्य दान करा. यामुळे माता अन्नपुर्णाचा आशीर्वाद मिळतो आणि धन-धान्याची आवक नेहमीच होत असते.