बिग बॉस 13 च्या प्राइज मनीवर सस्पेन्स, जाणून घ्या 12 विनर्सला किती रूपये मिळाले होते ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 चा ग्रँड फिनाले फक्त 3 दिवस दूर आहे. सर्वांना उत्सुकता आहे की, बिग बॉस 13 ची ट्रॉफी नेमकं कोण जिंकेल याची. 13 व्या सीजनच्या प्राईज मनीवर अद्याप सस्पेंस आहे. लवकरच याचा खुलासा होईल. आज आपण बिग बॉसचे 12 सीजनचे विनर्स आणि त्यांच्या प्राईज मनीबद्दल जाणून घेणार आहोत.

1) सीजन 12 – हा सीजन टीव्ही वरील पॉप्युलर बहु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका कक्करनं जिंकला होता. दीपिकाच्या प्रवासात तिची आणि श्रीसंत यांची बाँडिंग सर्वांनाच आवडली होती. दीपिकाला ट्रॉफी आणि 30 लाख रुपये प्राईज मनी म्हणून मिळाले होते.

2) सीजन 11 – भाभीजी घर पर है फेम शिल्पा शिंदेनं हिना खानला टक्कर दिली होती. परंतु शिल्पा शिंदेनं बाजी मारत हा सीजन जिंकला होता. शिल्पाला 44 लाख प्राईज मनी मिळाले होते. हिना खान फर्स्ट रनर अप राहिली होती.

3) बिग बॉस 10 – हा सीजन जबरदस्त हिट झाला होता. कॉमनर मनु पंजाबी आणि मनवीर गुर्जर यांच्या मैत्रीनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. नोएडाचा कॉमनर मनवीर गुर्जर हा विनर झाला होता. त्याला प्राईज म्हणून 40 लाख रुपये मिळाले होते.

4) बिग बॉस 9 – रिॲलिटी शोचा किंग प्रिंस नरूला यानं हा सीजन जिंकला होता. रिपोर्टनुसार, प्रिंसला 35 लाख रुपये प्राईज मनी मिळाले होते.

5) बिग बॉस 8 – हा सीजन हँडसम हंक गौतम गुलाटीनं जिंकला होता. करिश्मा तन्ना आणि गौतम गुलाटी यांच्यात तगडं कॉम्पीटीशन झालं होतं. गौतमला 50 लाख प्राईज मनी मिळाले होते.

6) बिग बॉस 7 – या सीजनमध्ये गौहर खान आणि कुशाल टंडन यांच्या लवस्टोरीची खूप चर्चा झाली होती. गौहरनं स्मार्ट गेम करत हा सीजन जिंकला होता. तिला 50 लाख रुपये मनी प्राईज मिळाले होते.

7) बिग बॉस 6 – कोमोलिकाच्या नावानं प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियानं या सीजन जिंकला होता. उर्वशीची स्ट्राँग पर्सनॅलिटी सर्वांनाच आवडली होती. तिला ट्रॉफी आणि 50 लाख प्राईज मनी मिळाले होते.

8) बिग बॉस 5 – हा सीजन सलमान खान आणि संजय दत्तनं होस्ट केला होता. कुमकुम फेम ॲक्ट्रेस जुही परमारनं हा सीजन जिंकला होता. रिपोर्टनुसार जुहीला एक कोटी रुपये प्राईज मनी मिळाले होते.

9) बिग बॉस 4 – कसौटी फेम ॲक्ट्रेस श्वेता तिवारीनं हा सीजन जिंकला होता. तिला 1 कोटी प्राईज मनी मिळाले होते.

10) बिग बॉस 3 – हा सीजन विंदू दारा सिंहनं जिंकला होता. विंदूला एक कार आणि 1 कोटी प्राईज मनी मिळाले होते.

11) बिग बॉस 2 – रोडीज फेम आशुतोष कौशिकनं हा दुसरा सीजन जिंकला होता. त्याला 1 कोटी प्राईज मनी मिळाले होते.

12) बिग बॉस 1 – आशिकी सिनेमातून पॉप्युलर झालेला ॲक्टर राहुल रॉयनं बिग बॉसचा पहिला सीजन जिंकला होता. त्याल 1 कोटी प्राईज मनी मिळाले होते.