DPU Hospital | डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त अवयव दात्यांचा केला सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – DPU Hospital | राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, यांच्या वतीने “अवयवदाता कृतज्ञता सन्मान 2023” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिनिधिक स्वरूपात १६ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये जिवंतपणी अवयवदान केलेल्या अवयवदात्यांचा तसेच मेंदूमृत अवयवदात्यांच्या कुटूंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला. (DPU Hospital)

या कार्यक्रमासाठी डॉ. संजय शिंदे (IPS Dr Sanjay Shinde), सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आणि डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांच्या हस्ते अवयवदात्यांचा व अवयवदात्यांच्या कुटूंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यापीठातील मान्यवर अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. (DPU Hospital)

हा सन्मान प्रदान करताना संपूर्ण सभागृह गहिवरून गेले होते. प्रत्येक जण भावनिक झाला होता. कुटूंबातील व्यक्तीनी अश्रूनयनांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. समोर आलेले दुःखातून सावरत इतरांसाठी अवयवदानाच धाडसी निर्णय घेतलेल्या कुटूंबियांना सभागृहातील प्रत्येकाने सांत्वन करीत नव्याने जगण्याचे बळ दिले.

स्मरण अवयवदात्यांचे, संकल्प अवयवदानाचा थीमच्या अनुषंगाने सामुदायिक कॅनव्हास पेंटिंगचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दोन कुशल कलाकारासह वैद्यकीय सेवा कर्मचारी विद्यार्थी, अवयदात्याचे कुटूंबीय यामध्ये सहभाग झाले होते. या एका मोठ्या कॅनव्हासवर अवयवदान व जनजागृतीपर भित्तिचित्रे रंगवली.

डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांनी #Pledge2Donate ही ऑनलाइन आणि डिजिटल मोहीम देखील सुरू केली आहे. स्वेच्छेने अवयवदान करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना प्रोत्साहन या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे ही मोहीम २१ जुलै २०२३ पासून सुरु आहे आणि आतापर्यंत १०० हून अधिक अवयव दानाच्या प्रतिज्ञा प्राप्त झाल्या असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दूरदृष्टी नेतृत्व असलेल्या डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, यांनी अवयव प्रत्यारोपण केंद्राची स्थापना करून ते अधिक मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. या प्रत्यारोपण केंद्रामध्ये आतापर्यंत २९७ बहु-अवयव प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले असून डॉ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जन आरोग्यहितसाध्य करीत आहेत

दि १ ऑगस्ट २०२३ रोजी डॉ. भाग्यश्री पी. पाटील वाढदिवसानिमित्त अवयवदानाची जागरूकता वाढविण्यासाठी प्रभातफेरी अर्थात वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात रुग्णालय व्यवस्थापन, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड म्हणाले, “ अवयवदान व प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये पोलिसांचा सक्रिय सहभाग असतो ग्रीन कॉरिडोर च्या माध्यमातून आमचे पोलीस प्रशासन तत्परतेनं कार्यरत असतात. रुग्णाला नवजीवन देण्यासाठी आमची पोलीस यंत्रणा कायमच कटिबद्ध असेल अशी ग्वाही दिली ते पुढे म्हणाले अवयव दान हे अभिजाततेचे आणि माणुसकीचे प्रतीक आहे. वास्तविक जीवनातील नायक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सत्कार समारंभाचा भाग होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. एक जबाबदार नागरिक या नात्याने मी प्रत्येक सक्षम व्यक्तीला आवाहन करतो की, पुढे या आणि वैयक्तिक स्तरावर या जीवन-वाचवण्याच्या कार्यात सहभागी व्हा. मी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे समाजाची सेवा करताना जागतिक दर्जाचे अवयव दान आणि प्रत्यारोपण सुविधा सक्षम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.”

या कार्यक्रमानिमित्त बोलताना डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ),
पिंपरी, पुणे म्हणाल्या,
“अवयवदानाबद्दल लोकांना शिक्षण देऊन आणि जागरूकता निर्माण करून अवयव दान
आणि प्रत्यारोपणा चे एक प्रतिष्ठित केंद्र निर्माण करण्याकडे माझा कल आहे.
इतरांचे प्राण वाचवण्यासाठी मोठे पाऊल उचलल्याबद्दल मी अवयव दात्यांची आभारी आहे
आणि हा सत्कार समारंभ त्याचाच एक भाग आहे.”

डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
पिंपरी, पुणे म्हणाल्या, “अभ्यासानुसार, प्रत्येक १० मिनिटांत एका रुग्णांचे नाव
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत नोंदवले जाते आणि त्यापैकी केवळ ३.२५% रुग्णांना
अवयव मिळण्याची शक्यता असते.
हे अंतर भरून काढण्यासाठी आम्ही लोकांना अवयवदानाविषयी जनगागृती करून अवयव दानाची
प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहन देत आहोत, त्यामुळे रूग्णांना प्रगत वैद्यकीय पायाभूत
सुविधांपर्यंत सहज पोचता येईल व हे अंतर कमी करण्यास मदत होईल.”

डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ),
पिंपरी, पुणे म्हणाले की, “अवयव दान हे जीव वाचवण्याची गुरुकिल्ली आहे
आणि आम्ही अनेक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत
आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सुविधांपैकी एक आहोत याचा आम्हाला आनंद वाटतो.
अवयव दानाचे महत्त्व जनसामान्यापर्यत पाहोचविण्यासाठी कायमच अग्रेसर आहोत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | नोरा फतेहीने जॅकलिनविरोधात वक्तव्ये केल्यास…” जॅकच्या वकिलांनी
नोराला सुनावले खडे बोल