Nora Fatehi | नोरा फतेहीने जॅकलिनविरोधात वक्तव्ये केल्यास…” जॅकच्या वकिलांनी नोराला सुनावले खडे बोल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे जॅकलीनच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग केस (Sukesh Chandrashekhar Money Laundering Case) ही सर्वश्रुत असून जॅकलिन यामुळे अडकली आहे. या केसमध्ये डान्सर नोरा फतेही (Dancer Nora Fatehi) हिचे देखील नाव दाखल झाले होते. मात्र तिला या मनी लॉन्ड्रिंग केसमधून (Nora Fatehi In Money Laundering) कोर्टाकडून क्लीन चीट मिळाली आहे. मात्र यानंतर नोराने माध्यमांसमोर जॅकलिन बद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. नोरा म्हणाली की मला उगाचच बळीचा बकरा बनवलं जात आहे. यावर आता जॅकलिनच्या वकिलांनी नोरा फतेहीला (Nora Fatehi) खडेबोल सुनावले आहेत. आणि परत वक्तव्य केल्यास कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.

अभिनेत्री जॅकलीनच्या वकिलांनी नोराला चांगलेच सुनावले आहे. मानहानीच्या प्रकरणात त्यांना अद्याप न्यायालयाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही असे देखील वकिलांनी सांगितले. तिचे वकिल पुढे म्हणाले की “आम्हाला अद्याप माननीय न्यायालयाकडून कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही अशा कोणत्याही घडामोडी खरे आहेत हे मानत नाही. जॅकलीनने या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट किंवा सोशल मीडियावर कधीही कोणाच्याही विरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही हे सगळ्यांना माहिती आहे. जॅकलीनने या प्रकरणाबाबत नेहमीच सन्माननीय मौन पाळले आहे कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निर्णयासाठी माननीय न्यायालयांसमोर प्रलंबित आहे त्यामुळे यावर जॅकलीन कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.”

“जॅकलीन सध्या शांत आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना कोणतीही चूक नसताना तिला कोणत्याही कारवाईमध्ये ओढले जाईल. जेव्हा न्यायालयासमोर कोणतीही कारवाई चालू असते तेव्हा सार्वजनिक डोमेनसमोर अशी विधाने करता येत नाहीत. हा न्यायालयाचा अवमान असतो. न्यायालयीन कामकाजाचे काही नियम असतात आणि त्याचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. परंतु जर जॅकलिनला अन्यायकारक बोगस खटल्यात तिच्या इच्छेविरुद्ध ओढले गेले तर ती देखील न्यायालयात जाईल.”

ते पुढे म्हणाले,”जर न्यायालयीन रेकॉर्ड लीक झाल्या असतील आणि या केसचे पक्ष नसतील अशा लोकांनी त्याचा वापर कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यासाठी केला तर त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानासाठी स्वतंत्र कायदेशीर कारवाईचा विचार केला जाऊ शकतो. लक्षात घ्या की माझ्या देखील क्लायंटला दावा ठोकण्याचा अधिकार आहे.”

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या न्यायालयाच्या पायऱ्या तुडवत आहे.
सध्या जॅकलिन व डान्सर नोरा फतेही (Jacqueline Fernandez And Nora Fatehi)
यांच्यामध्ये महाठग सुकेश चंद्रशेखरच्या केसवरुन शीतयुद्ध सुरु आहे.
नोरा (Dancer Nora Fatehi) जॅकलीनच्या विरोधात वक्तव्य करत म्हणाली की,
“तिने मला गोल्ड डिगर म्हटले आहे आणि माझ्यावर एका ठग (सुकेश चंद्रशेखर) सोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे आणि तिच्यापासून लक्ष हटवण्यासाठी चालू असलेल्या गुन्हेगारी प्रकरणात माझे नाव तिने घेतले आहे.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rajinikanth Jailer Movie Trailer | रजनीकांत यांचे जबरदस्त ॲक्शन सीनसह जेलर चित्रपटाचा ट्रेलर आऊट