Dr Ajay Taware | ‘मी शांत बसणार नाही. सगळ्यांची नावे घेणार…’ डॉ. तावरेंचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dr Ajay Taware | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident) आता नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.(Dr. Ajay Taware)

ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ.अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघांनी मिळून अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते. त्याऐवजी भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने पुन्हा एकदा घेत ते खबरदारीचा उपाय म्हणून औंधमधील सरकारी रुग्णालयामध्ये (Aundh Govt Hospital) दिले होते. दोन्ही रिपोर्ट मध्ये फरक आल्याने पोलिसांचा संशय वाढला.

त्यानंतर डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांवर भादवि १२० ब, ४६७, २०१, २१२, २१३
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटात सहभागी असणे, बनावट कागदपत्र तयार करणे, पुरावा नष्ट करण्याचा
आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

डॉ. अजय तावरे याने पोलिसांना कारवाई दरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार.’ असा इशारा दिला आहे.
त्यामुळे डॉ. तावरे कोणाकोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत, तोपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही, छगन भुजबळ आक्रमक

Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार प्रकरणात CP ना फोन केला? अंजली दमानियांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या!

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तडीपार केल्याच्या रागातून तरुणाला सिमेंटच्या गट्टू ने मारहाण, एकाला अटक