Dr Dabholkar Murder Case | डॉ. दाभोलकर खून प्रकरण : दोन्ही आरोपींच्या बहिणींची एकच साक्ष, ”रक्षाबंधन असल्याने ते आमच्यासोबत होते”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dr Dabholkar Murder Case | त्यादिवशी रक्षाबंधन असल्याने आरोपी शरद कळसकर औरंगाबादला तर सचिन अंदुरे अकोल्यात आमच्यासमवेत होते, अशी एकच साक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खुन खटल्यात आरोपी कळसकर आणि अंदुरे यांच्या बहिणींनी शुक्रवारी न्यायालयात दिली. (Dr Dabholkar Murder Case)

या खटल्यात सीबीआय वकिलांनी साक्षीदारांची उलटतपासणी पुढील तारखेला घेण्याची विनंती केली. आता पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. (Dr Dabholkar Murder Case)

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती केली आहे. मागील सुनावणीत बचाव पक्षाने दोन साक्षीदारांच्या नावांची यादी सादर केली होती. न्यायालयाने त्या साक्षीदारांना समन्स काढले होते.

न्यायालयाने बजावलेल्या समन्सनुसार शुक्रवारी अंदुरे आणि कळसकर यांच्या बहिणींची पी.पी. जाधव न्यायालयात
साक्ष झाली. यावेळी आरोपी कळसकरच्या बहिणीने न्यायालयात सांगितले की, २० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होते.
त्यादिवशी भाऊ शरद हा रक्षाबंधनासाठी आला होता. तर सचिन अंदुरे यांच्या बहिणीने देखील साक्ष देताना म्हटले की,
सचिन रक्षाबंधनासाठी अकोल्याला माझ्याकडे आला होता. त्याचा आंतरजातीय विवाह असल्याने त्याच्या लग्नात मध्यस्थी करावी अशी त्याची इच्छा होती. तेव्हा आई वडिलांना आवडणार नाही. तू असे करू नकोस असे त्याला मी समजावल्यावर तो राखी बांधून निघून गेला.

बचाव पक्षाच्या वतीने वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी १६ जानेवारीला होणार असून यावेळी
सीबीआय वकिलांतर्फे दोन्ही साक्षीदारांची उलट तपासणी घेतली जाईल.

दाभोलकर खून प्रकरणात सीबीआयने एकुण २० साक्षीदार सादर केले आहेत.
त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने आरोपींना ३०० पेक्षा जास्त प्रश्न
विचारले होते. त्यावेळी आरोपींनी बहुतांश प्रश्नांना माहिती नाही, अशी उत्तरे दिली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder | गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ”टोळीयुद्ध होणार नाही, शासन बंदोबस्त करेल” (Video)