Dr Rajendra Jagtap | पुणे : डॉ राजेंद्र जगताप यांनी स्विकारला प्रधान निदेशालय दक्षिण कमानमध्ये पदभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Rajendra Jagtap | महू कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ, सनदी अधिकारी डॉ राजेंद्र चंद्रकांत जगताप यांनी मंगळवारी ( दि २२ ) दक्षिण कमान पुणे येथे प्रिन्सिपल डायरेक्टर तथा प्रदान निदेशालय दक्षिण कमानमध्ये पदभार स्वीकारला. ते कॅन्टोन्मेंट बोर्ड महू येथून आपला दोन वर्षाचा कार्यकाल उरकून दक्षिण कमान पुणे येथे सेवेसाठी उपस्थित झाले आहेत. (Dr Rajendra Jagtap)

महू कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे काम करत असताना त्यांनी विविध उपक्रम व प्रोजेक्ट राबवत असताना राष्ट्रीय पातळीवरती स्वच्छता पारितोषिक त्याचप्रमाणे रक्षा मंत्री यांचे शिक्षणामध्ये पारितोषिक व मध्यप्रदेश राज्य सरकारचा विशेष पारितोषिक देखील मिळवलेले आहेत. महू येथील आपला दोन वर्षाचा कार्यकाळ संपून ते पुन्हा एकदा पुण्यामध्ये येत आहेत. (Dr Rajendra Jagtap)

डॉ राजेंद्र जगताप यांनी आता पदभार स्वीकारलेल्या प्रधान निदेशालय दक्षिण कमान यांच्या कार्यक्षेत्र मध्ये प्रामुख्याने रक्षा मंत्रालयाशी संलग्न असलेले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डीआरडीओ, कोस्ट गार्ड अशा विभिन्न संस्थांचे कामकाज याअंतर्गत केले जाते. यामध्ये असणाऱ्या राज्यांत प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ तसेच ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंदमान, निकोबार, पाॅंडीचेरी, दिव – दमण यांचा समावेश आहे.


डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त असताना घनकचरा,
आरोग्य, पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी विशेष उपक्रम राबविले.
तसेच सेवाक वर्गामध्ये अग्रणीय बदल करण्यामध्ये त्यांचे विशेष योगदान होते.
पुणे स्मार्ट सिटी चे सीईओ असताना राष्ट्रीय पातळीवरती जवळपास ८ पेक्षा अधिकदा पुणे स्मार्ट सिटी ला
केन्द्र शासनाच्या MOHUA माध्यमातून पारितोषिक प्राप्त करून दिले.
तसेच औंध, बाणेर, बालेवाडी व पुणे शहराच्या विभिन्न ठिकाणी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. पीएमपीएमएल मध्ये अध्यक्ष तथा सीएमडी असताना सातवा वेतन आयोग तसेच ग्रामीण भागातील बससेवा आणि पीएमआरडीए ला समाविष्ट करणे याबरोबरच अटल बस सेवा , एअरपोर्ट बस आणि १० रुपयांमध्ये बससेवा असे पीएमपीएमएलच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबवले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेकडून अटक, 10 लाखांचे मेफेड्रोन जप्त

खुनाचा प्रयत्न, घरफोडी करणाऱ्या अक्षयसिंग जुन्नी व त्याच्या इतर 3 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 51 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA