Pune Police MCOCA Action | खुनाचा प्रयत्न, घरफोडी करणाऱ्या अक्षयसिंग जुन्नी व त्याच्या इतर 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 51 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | धारदार शस्त्राने वार करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अक्षयसिंह जुन्नी व त्याच्या इतर तीन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 51 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

फिर्यादी व त्यांचे मित्र घरासमोर उभे असताना आरोपी अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय-22 रा. वैदवाडी, हडपसर) व त्याच्या इतर तीन साथिदारांनी काही कारण नसताना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच फिर्यादी यांना फ्लेक्स व बॅनर लावण्याचे काम करायचे असेल तर प्रत्येक महिन्याला हप्त्याची (Extortion) मागणी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी एक हजार रुपये देण्याचे मान्य करुन सध्या पैसे नसल्याचे सांगितले. यावरुन आरोपींनी फिर्यादी यांचे दोन्ही हात पाठीमागून पकडून ‘तुला फार मस्ती आली आहे, तु कसा हप्ता देत नाही ते बघतो’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत डाव्या डोळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने वार केले.

तसेच धारदार हत्यारे हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहे, तक्रार केली तर मारुन टाकीन’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आयपीसी 307, 384, 324, 504, 506, 34 यासह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 जुलै रोजी घडला आहे.

तपासादरम्यान टोळी प्रमुख अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय-22 रा. वैदवाडी, हडपसर), कुलदिपसिंग उर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय-21 रा. बिराजदारनगर, हडपसर), विशाल उर्फ मॅक्स किशोर पुरेबीया (वय-22 रा. जुना म्हाडा कॉलनी, हडपसर) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे, घरफोडी (Burglary), चोरी (Theft) यासारखे 14 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Senior PI Ravindra Shelke) यांनी परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख-केदार (ACP Ashwini Rakh-Kedar) करीत आहेत.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 51 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख-केदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके,
पोलीस निरीक्षक गुन्हे पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivle),
सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप (API Sarika Jagtap),
सहायक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे (API Deepak Barge), पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे, महेश उबाळे,
गिरीष एर्कोगे, अंकुश निकम, राकेश चव्हाण, महिला पोलीस अंमलदार खैरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | खळबळजनक! पोलीस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीची हत्या करुन पतीनेही संपवले जीवन

Personal Loan Interest Rates | पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय, या बँका देत आहेत सर्वात कमी व्याजावर कर्ज

Tomato Price Update | नेपाळचे टोमॅटो आल्याने खाली आला भाव, किरकोळ बाजारात इतके रुपये किलो झाली किंमत