Dream Girl 2 | आयुष्मान खुराना मारायचा गर्लफ्रेंडसोबत मुलीच्या आवाजात गप्पा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाची (Dream Girl 2) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याच्या 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचा हा सिक्वेल (DREAM GIRL Sequel) आहे. यामध्ये आयुष्मानने नोकरीसाठी कॉल सेंटरवर जॉब करणाऱ्या पुजाची हटके भूमिका साकारली होती. तो पुरुष असून देखील महिलेच्या आवाजामध्ये लोकांना खिळवून ठेवत होता. त्याची ही भूमिका आणि त्याने काढलेले आवाज याची प्रेक्षकांनी खूप वाह वाह केली होती. या चित्रपटासाठी अभिनेता आयुष्मान खुराना याने कशी तयारी केली होती आणि त्यावेळेसचे गंमतीदार किस्से आयुष्मानने (DREAM GIRL 2) शेअर केले आहेत.

अभिनेता आयुष्मान खुराना हा सध्या त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सध्या तो प्रमोशनमध्ये व्यस्त असून यावेळी त्याने ‘ड्रीम गर्ल’ या पहिल्या चित्रपटासाठी कशी तयारी केली होती. आवाजामध्ये तो वेगळेपणा आणण्यासाठी काय केले याबद्दल सांगितले तसेच त्याने मज्जेशीर किस्से देखील शेअर केले आहे. तो त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडला देखील कॉल लावून मुलींच्या आवाजामध्ये गप्पा मारत असे. आयुष्मान म्हणाला की, “या पात्रासाठी माझे रेडिओ जॉकी आणि नाटकामध्ये काम करणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरले आहे. मी जेव्हा रेडिओ स्टेशनवर काम करत होतो तेव्हा मी एक स्त्री म्हणून प्रँक कॉल करायचो. एवढेच काय तर मी माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला देखील असे कॉल लावले आहेत. मी तिला कॉल करायचो आणि तिच्या वडिलांनी लँडलाइन उचलल्यास मी तिची मैत्रीण असल्यासारखे भासवत असून असाच आवाज काढायचो.”

पुढे तो म्हणाला की, “एकता (कपूर) आणि मला आधीच्या चित्रपटापेक्षा आत्ताचा चित्रपट अधिक मजेशीर करायचा होता
आणि मला वाटते की आम्ही ते नक्कीच करू शकलो आहोत. हा खरोखरच चित्रपटाचा 2.O आहे…यामध्ये मजा दुप्पट आहे.”
अभिनेता आयुष्मान खुराना याचा बहुचर्चित चित्रपट ‘ड्रीम गर्ल 2’ हा येत्या 25 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस
(Dream Girl 2 Release date) येणार आहे. यामध्ये आयुष्मान सोबत पहिल्यांदा अभिनेत्री अनन्या पांडे
(Ananya Pandey) स्क्रीन शेअर करणार आहे. त्यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. ‘ड्रीम गर्ल 2’ चे
(Dream Girl 2) दिग्दर्शन राज शांडिल्य (Raaj Shaandilyaa) असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने (Ekta Kapoor) केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | पर्वती भागात दहशत माजविणाऱ्या बिपीन मापारी व त्याच्या इतर 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 45 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Keshav Upadhye In Pune | भाजपातर्फे 14 ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार; नागरिकांच्या सहभागाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन