Dream Girl 2 | ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे पोस्टर आऊट; स्त्री वेशभूषा पाहून नेटकरी हैरान, रिलीज डेट आली समोर

पोलीसनामा ऑनलाइन – Dream Girl 2 | बॉलीवुडमध्ये सध्या अनेक चित्रपटांचे सिक्वल येत आहेत. मागील काही वर्षांमध्ये हीट झालेल्या चित्रपटांचे सिक्विल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये बहुचर्चित अशा ड्रीम गर्ल चित्रपटाचा देखील सिक्विल येणार आहे. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याची प्रमुख भूमिका असलेला ड्रीम गर्ल चित्रपटाचा सिक्विल ‘ड्रीम गर्ल 2’(Dream Girl 2) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट (Dream Girl 2 Poster Out) करण्यात आले असून चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अभिनेता आयुष्मान खुराना याची मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) चित्रपट 2019 साली प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हटके कहानी असलेल्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती आता याचा सिक्विल प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. अभिनेता आयुष्मान खुराना याने त्याच्या सोशल मीडिया अंकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर आऊट केले आहे. यामध्ये आरशासमोर अभिनेता आयुष्मान उभा असून एका बाजूला तो पुरुषी वेशामध्ये लिपस्टिक लावताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला तो सुंदर स्त्रीच्या वेशात दिसत आहे. स्त्री रुपामध्येही तो लिपस्टिक लावताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस (Dream Girl 2 Release Date) येणार आहे.

अभिनेता आयुष्मान खुराना हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल तो सोशल मीडियावर अपडेट देत असतो. यावेळी त्याने इंस्टाग्रामवर त्याचे ‘ड्रीम गर्ल 2’(Dream Girl 2) चे पोस्टर आऊट केल्यानंतर चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टर अपलोड करताना त्याने दिलेले कॅप्शन देखील लक्षवेधी आहे. आयुष्मानने लिहिले आहे की, “ये तो सिर्फ झलक हैं, ऑबजेक्ट इन द मिरर आर मोर खूबसुरत देन दे अपियर” त्याच्या या कॅप्शनमुळे चित्रपटांमध्ये देखील जबरदस्त ड्रामा व मनोरंजन असणार आहे हे समोर येत आहे.

‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना बरोबरच अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey), परेश रावल (Paresh Rawal), राजपाल यादव (Rajpal Yadav) हे कलाकार भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची निर्मिती एकता कपूर (Ekta Kapoor) हिने केली असून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राज शांडिल्य (Raaj Shaandilyaa) यांनी उचलली आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपट येत्या 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर आऊट झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi to inaugurate various projects on August 1 in Pune; Know In Details

3 minors raped & impregnated on pretext of marriage in Pune, three cases registered under POCSO on same day

Vicky Kaushal And Katrina Kaif | “कतरिनाच्या बॉलीवुड अनुभवांचा मला होतोय फायदा” ; विकीने केले पत्नीचे कौतुक