Drought Control War Room | दुष्काळाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या गावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन – Drought Control War Room | सध्या महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील पर्जन्य (Monsoon Update) योग्य प्रमाणामध्ये पडलेला नाही. याचा विपरित परिणाम राज्यातील खरीप पिकांवर होत असून शेतकऱ्यांची चिंता यामुळे वाढली आहे. काही ठिकाणी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. आता राज्याच्या या दुष्काळग्रस्त स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयाच्या वॉर रूममध्येच ‘दुष्काळ नियंत्रण वॉर रूम’ (Drought Control War Room) बनवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मंत्रालयाच्या (Maharashtra Government Mantralaya) सातव्या मजल्यावर सीएम वॉर रुममध्येच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘दुष्काळ नियंत्रण वॉर रूम’ बनवण्यात आली आहे. आज (दि.29) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे दोघे या रूमचा आढावा घेणार आहेत. अजूनही राज्यामध्ये चांगला पाऊस न झाल्याने अनेक गावं, जिल्हे हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आली आहेत. अनेक गावांमध्ये शेतीपुरते आणि पिण्यापुरते देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही. अशा सर्व गावांवर मंत्रालयातील या वॉर रूममधून नजर ठेवण्यात येणार आहे. दुष्काळ नियंत्रण वॉर रूमसोबत राज्यभरातील सर्व जिल्हे जोडण्यात येणार असल्यामुळे यामधून राज्याचा दुष्काळ एकाच जागेहून नियंत्रित करण्यात येणार आहे.

या दुष्काळ नियंत्रण वॉर रूममुळे (Drought Control War Room) राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील दुष्काळाचा व
पाण्याचा उपलब्ध साठा याबद्दल माहिती मिळणार आहे.
या रूमच्या माध्यमातून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावांना यामधून बाहेर काढले जाणार आहे.
ऑगस्ट महिन्यातील पावसाचे प्रमाण हे मागील 8 वर्षांपेक्षा या वर्षी सर्वात कमी आहे.
राज्यभरात अपेक्षित सरासरी पाऊस न झाल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
यासाठी राज्य सरकारतर्फे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
या कामासाठी विशेष अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याकडून आढावा घेऊन राज्य सरकार योग्य पाऊले उचलणार आहे.
या आढाव्यामध्ये पाण्याच्या गरजेनुसार पाण्याचे आरक्षण देखील केले जाईल अशी माहिती समोर येत आहे.
नुकतेच राज्य सरकारतर्फे धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार हे पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरता योग्य प्रमाणात वापरण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | रक्षाबंधन :पुण्याच्या पोलीस उपायुक्तांनी साधला बालगोपाळांशी संवाद