Drug Dealer Lalit Patil | ललित पाटीलचं आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्स तस्करीचं जाळं, नेपाळला पळून गेल्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Drug Dealer Lalit Patil | ड्रग्स तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या ललित पाटील या आरोपीने संशयास्पदरित्या पलायन केल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना नेपाळच्या सीमेवरुन अटक केली असली तरी ललित पाटील हा नेपाळमध्ये पळून गेला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ललित पाटील ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) पळून गेल्यानंतर पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं. (Drug Dealer Lalit Patil)

ड्रग माफिया ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेफेड्रोन विक्रीचं रॅकेट चालवत असताना त्याचे देशातील तसेच विदेशातील ड्रग्स माफियांशी आधीपासूनच संबंध आहेत. याचाच आधार घेऊन ललित पाटीलने नेपाळमध्ये आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे. त्याचा भाऊ भुषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असली तरी ललित पाटील पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे. (Drug Dealer Lalit Patil)

आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्स तस्करीचं जाळं

दुबई, थायलंड आणि मलेशिया या देशांमध्ये ललित पाटील मेफेड्रॉन पाठवत होता.
पोलिसांना आणि डॉक्टरांना हाताशी धरून ज्या प्रकारे त्याने पुण्यात ड्रग्स तस्करीचं जाळं विणलं होतं तसंच
आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यानं नेटवर्क निर्माण केलं होतं. त्याचाच आधार घेऊन तो ससूनमधून निसटल्यानंतर
नेपाळ बॉर्डर वर पोहचला. या प्रकरणात वाढत चालली व्याप्ती पुणे पोलिसांसमोरील आव्हान आणखी वाढवणारी आहे.

हॉटेलच्या फुटेजमध्ये दिसला ‘तो’ पोलीस कर्मचारी

दरम्यान, ललित पाटील प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.
ललितने ससून हॉस्पिटलमधून पलायन केल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये पोहोचला त्याच हॉटेलमध्ये अवघ्या एका तासात पोलीस कर्मचारी दिसला. हा पोलीस कर्मचारी त्याठिकाणी कसा पोहचला? कशासाठी आला होता? असे प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन ललित पळून गेला असे सांगण्यात येत आहे, तोच पोलीस कर्मचारी एका तासात हॉटेलमध्ये गेला होता. ललित पाटीलच्या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMPML Special Bus Service- Worldcup 2023 | क्रिकेटप्रेमी PMPML च्या बसने थेट जाऊ शकतील गहुंजेला, तारीख-वेळ-बसथांबा जाणून घ्या