Pune PMPML Special Bus Service- Worldcup 2023 | क्रिकेटप्रेमी PMPML च्या बसने थेट जाऊ शकतील गहुंजेला, तारीख-वेळ-बसथांबा जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMPML Special Bus Service- Worldcup 2023 | क्रिकेट विश्वचषकातील काही सामने पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहेत. हे सामने पाहण्यासाठी जाणाèया क्रिकेट प्रेमींसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. सामन्याच्या दिवशी मनपा भवन, कात्रज बायपास आणि निगडी टिळक चौकातून या बसेस सोडल्या जातील. (Pune PMPML Special Bus Service- Worldcup 2023)

पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील पाच सामने खेळवले जाणार आहेत. सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून ज्यादिवशी गहुंजे येथे मॅच असेल तेव्हा पीएमपी येण्या-जाण्याच्या सोयीसाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध केली जाईल. (Pune PMPML Special Bus Service- Worldcup 2023)

या बससाठी प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकावरून जादा बसेस सोडल्या जातील.
मनपा व निगडी बायपास येथून प्रतिव्यक्ती १०० रुपयांचे तिकीट असेल. क्रिकेट सामना संपल्यानंतर परतीसाठी बस असेल.

डे नाईट सामन्यांसाठी बसचे वेळापत्रक

१९, ३० ऑक्टोबर, १ आणि ८ नोव्हेंबरला गहुंजे मैदानावर डे-नाईट सामने होणार आहेत. त्या दिवशी पुणे मनपा भवन येथून सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेत बस सुटतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ११ आणि ११.३० वाजता बस सुटेल. तर, निगडी टिळक चौकातून दुपारी १२ आणि १२.३० वाजता बस सुटेल.

दिवसा सामन्याची तारीख व बस सुटण्याची वेळ

गहुंजे येथे ११ नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील एकमेव सामना दिवसा होणार आहे. या सामन्यासाठी मनपा भवन
येथून सकाळी ८.२५, ८.५०, ९.०५ अशा तीन बसेस सोडल्या जातील. कात्रज बायपास येथून सकाळी ८.१५ व ८.३५ वाजता
बस सुटेल. निगडी टिळक चौकातून सकाळी ८.३० व ९.०० वाजता बस सुटेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parth Ajit Pawar – PDCC Bank Pune | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पार्थ पवार?