कलयुग ! पतीची दारू सोडविण्याचा प्रयत्न पत्नीला पडला चांगलाच महागात, निवृत्त जवानाकडून बलात्कार

इटावा : पोलिसनामा ऑनलाईन – दारूमुळे अनेकांचे संसार मोडले आहेत. मात्र या दारुमुळेच एका व्यक्तीच्या पत्नीवर संकट कोसळलं. पतीची दारुची सवय सोडविण्यासाठी इटावा येथे गेलेल्या महिलेवर निवृत्त जवानाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी भजनपुरा येथे राहणारी महिला आपल्या दीराला फोन करीत होती. तेव्हा तिच्या मोबाइलवरुन एक राँग नंबर डाइल झाला. हा क्रमांक इटावा येथे राहणाऱ्या निवृत्त जवानाचा होता. दरम्यान महिला आपल्या पतीच्या दारुच्या व्यसनाबद्दल त्यांच्याशी बोलत होती. यावर पतीची दारू सोडविण्यासाठी उपाय असल्याचं सांगून निवृत्त जवानाने महिलेला इटावा येथे बोलावलं. ज्यानंतर जवानाने कारमध्ये महिलेवर बलात्कार केला. महिलेची नजर चौकातील पोलिसांकडे गेली असता ती कशीबशी गाडीतून उतरून बाहेर पडली व धावत पोलिसांकडे गेली. तिने पोलिसांना तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल केली व तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आलं.

यासंदर्भात एसपी सिटी यांनी सांगितलं की, पतीचं व्यसन सोडविण्यासाठी मदत करेन असं सांगून निवृत्त जवानाने इटावा येथे बलात्कार केल्याची तक्रार बढपुरा पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी रात्री एका महिलेने दाखल केली.या प्रकरणात तपास सुरू आहे.