ऑनलाइन शॉपिंग करताना नकली वस्तू देऊन होतेय फसवणूक, जाणून घ्या अशावेळी काय कराल

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विविध ई- कॉमर्स कंपन्याकडून दसरा, दिवाळी फेस्टीव्हल सेलचा धडाका सुरु आहे. मात्र अशावेळी ऑनलाईन खरेदी करताना सावध रहा, कारण या दरम्यान नकली सामानाची विक्री होण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन खरेदी करताना मिळणार्या मोठ्या डिस्काऊंटमुळे अनेकजण अशा सेलमध्ये खरेदी करण्यास पसंती देतात. इलेक्ट्रानिक वस्तू, फुटवेअर, खाण्यापिण्याचे सामान, खरेदी करताना सावध रहा. ऑंथेटिकेशन सॉल्युशन प्रोव्हाडर असोशिएशननुसार अशावेळी नकली सामान विक्री होण्याची शक्यता असते. एका अंदाजानुसार, 2018 -19 मध्ये ऑनलाईन नकली विक्रीच्या प्रकारात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा कोरोनामुळे ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी करताना सावधगिरी बाळगण महत्वाच ठरणार आहे.

ऑंथेटीक संकेतस्थळावरून खरेदी करा
ऑफर्सच्या जाळ्यात अडकू नका, वेबसाईट किती ऑंथेटीक आहे, हे तपासा, अनेकदा ऑफर्सशी जोडलेल्या बेवसाईट खोट्या वेबासाईट प्लॅटफार्मवर पोहतात त्यामुळे सतर्क रहा, असे ऑंथेटिकेशन सॉल्युशन प्रोव्हाईडर असोशिएशनचे अध्यक्ष नकुल पसरीचा यांनी सांगितले.

पार्सल खोलताना चित्रीकरण
ऑनलाईन पार्सल घऱी आल्यानंतर ते खोलताना त्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डीग करा. यामुळे सामान नकली असल्यास किंवा डिफेक्टीव्ह असल्यास परत करता येण सोप होते. तससेच मिठाई, चॉकलेट आदी ऑनलाईन खऱेदी करताना स्पेलिंग, पॅकेजिंग तपासावे. याकरिता फुड रेग्युलेटर एफएसएसएआयच्या स्मार्ट कंझ्युमर अ‍ॅपची मदत घेता येईल.