Dussehra Melava | BMC नं दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली, शिवसेनेला शेवटचा पर्याय कोणता?, अनिल परब यांनी स्पष्टचं सांगितले, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा मेळाव्यावरुन (Dussehra Melava) उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) यांच्या रस्सीखेच सुरु असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर (BKC MMRDA Ground) मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्विकारण्यात आला आहे. तर, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्यासाठी दोन्ही गटांना मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation (BMC) परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पुढची रणनिती काय असेल? आगामी काळात शिवसेना रस्त्यावरची लढाई लढवणार का? याबाबत आमदार अनिल परब यांनी भाष्य केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही आमची पुढची रणनीती ठरवू असे अनिल परब (MLA Anil Parab) यांनी सांगितले.

शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा (Dussehra Melava) आयोजित केल्यास उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटांपैकी कोणत्याही एका गटास परवानगी दिली तर शिवाजी पार्क सारख्या संवेदनशील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने (Shivaji Park Police Station) दिल्याने मुंबई महापालिकेने दोन्ही गटांचा अर्ज बुधवारी फेटाळल्याची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सुधारणा करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. यावर शुक्रवारी (दि.23) सुनावणी होणार आहे.

मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही.
कदाचित पोलिसांनी पालिकेला याबाबत अहवाल दिला असेल.
या अहवालाच्या आधारावरच पालिकेने तसे पत्र दिले असेल.
या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. उद्या या सर्वांचीच न्यायालयात चर्चा होईल.
उद्या न्यायालय निकाल काय देणार हे पाहिले जाईल.
त्यानंतर रस्त्यावरची लढाई लढायची की नाही ते ठरवले जाईल, असे अनिल परब यांनी सांगितले.
तसेच न्यायालयात आमच्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Web Title :-  Dussehra Melava | anil parab on uddhav thackeray group upcoming planning for dussehra melava

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार

Shambhuraj Desai | अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश