Dussehra Melava | शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार? देवेंद्र फडणवीसांचे पुण्यात सूचक वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खरी शिवसेना (Shivsena) आमची असल्याचा दावा शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) केला आहे. शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे दसरा मेळावा (Dussehra Melava) कोण घेणार यावरुन दोन्ही गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्यासाठी शिवसेनेनं दोन वेळा अर्ज केला आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, दसरा मेळावा घेण्यासाठी सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही, नियमात असेल त्यांना मैदान दिले जाईल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्या (Dussehra Melava) संदर्भात भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, शिंदे गटाची जी ओरिजनल शिवसेना आहे ती आमच्याबरोबर आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्यासोबत आले आहेत, त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार, असा सवाल त्यांनी केला. उरलेली शिल्लक सेना असेल तर शिंदे साहेब, आम्ही ठरवू, कल्याण लोकसभेच्या (Kalyan Lok Sabha) जागेवरुन त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या जागेवर भाजप (BJP) दावा करत असल्याच्या चर्चेवर फडणवीसांनी हे मत व्यक्त केले. तसेच मीडियाने उगाच पतंगबाजी करु नये, असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्यामुळे त्यांना निराशा आली
आहे. त्या निराशेतून ते बोलत आहेत, त्यामुळे निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते, असं म्हणत त्यांनी उद्धव
ठाकरेंना टोला लगावला.

आमचं मिशन महाराष्ट्र, मिशन इंडिया चाललेलं आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येतं त्यामुळे बारामती हे वेगळं नाही.
सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सुनावणीत चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, सुप्रीम कोर्टाबद्दल बोलताना आपण जबाबदारीचं भान राखणं गरजेचं आहे,
असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title :- Dussehra Melava | who will get permission for dasara melva at shivaji park devendra fadnavis statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Market Yard | अनंत चतुर्दशीला पुण्यातील मार्केट यार्ड (फळे, भाजीपाला, फुल बाजार) बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’

Detox Diet | रोज करा हे काम, बॉडी डिटॉक्स सोबत वजन सुद्धा वेगाने होईल कमी

Benefits Of Hibiscus | ब्लड शुगर आणि मेटाबॉलिज्म बॅलन्स करण्यासाठी, जाणून घ्या जास्वंद ज्यूसचे फायदे