Detox Diet | रोज करा हे काम, बॉडी डिटॉक्स सोबत वजन सुद्धा वेगाने होईल कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Detox Diet | कोरोनानंतर, आपण आरोग्य राखण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे सेवन करत असतो, ज्यामुळे इम्युनिटी (Immunity) मजबूत राहते आणि शरीर देखील डिटॉक्स होते. काही पदार्थ खाल्ल्याने आणि काही ’क्लींजिंग’ ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते (Detox Diet). आणि वजन कमी (Weight Loss) करण्यास देखील मदत होते. शरीर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी काय केले पाहिजे ते जाणून घेवूयात (Strong Immunity Tips)…

 

डिटॉक्स म्हणजे काय?
डिटॉक्स किंवा डिटॉक्सिफिकेशन हा अल्प-कालीन आहार हस्तक्षेप आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. हे करण्यासाठी, उपवास करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीरातील कोणत्याही प्रकारचे विष बाहेर टाकण्यास मदत होते. कारण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण मुख्यतः ज्यूस किंवा फळांचे सेवन करतो. त्यामुळे शरीराला पुरेसे पोषक तत्व मिळतात आणि संपूर्ण शरीर स्वच्छ होऊ लागते. अशावेळी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. (Detox Diet)

 

दररोज हे करा
प्रत्येक जेवणानंतर अर्धा इंच आले घ्या

शतपावली करा (प्रत्येक जेवणानंतर 100 पावले चालणे आवश्यक)

रात्रीचे जेवण सूर्यास्ताजवळ करा

फळे इतर कोणत्याही अन्नात मिसळू नका

मध गरम करू नका

दूध इतर कोणत्याही फळ किंवा खाद्यपदार्थात मिसळू नका

या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या शरीराला चपळ बनवण्यास आणि कोणत्याही प्रकारच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करतात. जर तुम्ही रोज तेलकट पदार्थांचे सेवन करत असाल तर आत्तापासूनच वर्ज्य करा आणि लक्षात घ्या की कोणत्याही अन्नात कोणतीही वस्तू मिसळून काहीही खाऊ नका. उदाहरणार्थ, जर तुम्ही दूध (Milk) घेतले तर त्यात केळी (Banana) मिसळू नका, एक ग्लास शुद्ध दुधाचे सेवन करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Detox Diet | detox diets really help remove toxins from the body and loss your weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी आजारांत मिळेल दिलासा

 

Men’s Health | दीर्घकाळ आरोग्य कायम राखण्यासाठी ‘ही’ आहेत 5 पोषकतत्व, डाएटमध्ये ताबडतोब करा समावेश

 

Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगत PG मालकाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना