सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते ई-शाळेचा शुभारंभ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच संगणकाची आवड निर्माण व्हावी. संगणक हाताळणीचे ज्ञान त्यांना मिळावे. यासाठी प्रत्येक शाळा डिजिटल शाळा होणे गरजेचे आहे. याच एक भाग म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा निंबर्गी ई-शाळेचा शुभारंभ सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निंबर्गीच्या सरपंच भावना बिराजदार यांच्यासह गावातील मान्यवर व्यक्ती, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. ई-शाळा शुभारंभानंतर सहकारमंत्री देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.