1 मार्चपासून बंद होतील ‘या’ बँकांचे IFSC कोड, ऑनलाइन मनी ट्रान्सफरला लागेल ब्रेक, त्रास वाचवण्यासाठी करा ‘हे’ काम

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (बीओबी)ने आपल्या ग्राहकांना सूचना केली आहे की, ई-विजया आणि ई-देना चे आयएफएससी कोड 1 मार्च 2021 पासून बंद होणार आहेत. बीओबीने ग्राहकांना सांगितले की, दोन्हीसाठी नवीन आयएफएससी कोड प्राप्त करणे खुप सोपे आहे.

विजया बँक आणि देना बँकेच्या ग्राहकांनी नवीन आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी वेबसाइटवर जाऊ शकता किंवा Amalgamation बँकेच्या हेल्पडेस्कला कॉल करू शकता किंवा शाखेशी संपर्क करू शकता. याशिवाय एसएमएसच्या सुविधेचा सुद्धा उपयोग करू शकता. हेल्पलाइन नंबर 18002581700 आहे तसेच ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 8422009988 वर जुन्या खाते क्रमांकाचे शेवटच्या 4 अंकासह एसएमएस करू शकता. या फॉर्मेटमध्ये मॅसेज पाठवायचा आहे – MIGR जुने खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक.

राष्ट्रीयकृत बँकेने मागील वर्षी डिसेंबरमध्ये विजया बँक आणि देना बँकेच्या 3,898 शाखांचे विलिनिकरण पूर्ण केले होते. या अंतर्गत 5 कोटीपेक्षा जास्त ग्राहक खाती मायग्रेट केलेली खाती होती. बँकेने म्हटले, सर्व ग्राहक आता भारतात एकुण 8,248 शाखा आणि 10,318 एटीएमचा फायदा घेऊ शकतात. विलिनिकरणानंतर बँक ऑफ बडोदा देशातील सर्वात मोठी दुसरी बँक बनली आहे.

जानेवारी महिन्यात बँक ऑफ बडोदाने मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपवर बँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली. बँक ऑफ बडोदा व्हॉट्सअपद्वारे खात्यातील बॅलन्सची माहिती, मिनी स्टेटमेंट, चेकच्या स्थितीची माहिती, चेकबुक विनंती, डेबिट कॉर्ड ब्लॉक करणे आणि उत्पादने आणि सेवांबाबत माहिती सारख्या सेवा उपलब्ध करत आहे.